सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
बारामती : प्रतिनिधी
मागील आठवड्यात 24 कॅरेट सोन्याच्या बाजारभावाने 75 हजारांचा टप्पा ओलांडला तर चांदीच्या बाजारभावाने 96 हजारांचा टप्पा ओलांडून नवीन नवीन उचाँक केला होता, चांदीच्या बाजारभावाने तर 11 वर्षाचे रेकॉर्ड तोडले आहे. अशातच आज अचानक सोन्याचे भाव तोळ्याला अडीच हजार रुपयांची कमी झाले तर चांदीचे भाव किलोला 5 हजार रुपयांनी कमी झाले.
बाजारभाव कमी होण्याची कारणे सांगताना,इंडिया बुलिअन अँड ज्वेलर्स असोसिएशन चे पश्चिम महाराष्ट्र प्रमुख किरण आळंदीकर यांनी सांगितले.
सोने - चांदीचे बाजारभाव आंतरराष्ट्रीय घडामोडीवर अवलंबून असतात, यामध्ये अमेरिकन फेडरल रिझर्व्ह बँकेचे व्याजदर, उत्पादन,मागणी व पुरवठा,चलनातील चढउतार, भुराजकीय परिस्थिती या सारख्या अनेक बाबींवर बाजारभाव ठरतात.
अमेरिकन फेडरल रिझर्व्ह बँक व्याजदरामध्ये कपात करणार असे संकेत मिळत असल्याने सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याला भारतासह अनेक देशातून मागणी वाढली, पर्यायाने भाववाढ होऊन सोने चांदीने नवीन विक्रम प्रस्थापित केले परंतु काल रात्री फेड च्या झालेल्या मिटिंग मध्ये व्याजदर कमी करण्यापेक्षा वाढवण्याचा विचार होऊ शकतो असे सुतोवाच मिळाल्याने सोन्याचे आणि चांदीच्या भावात घसरण झाली.
याचा फायदा सोने चांदी खरेदी करणारांना आणि गुंतवणूकदारांना नक्की होईल कारण दिवाळी पूर्वी अमेरिकन फेडरल रिझर्व्ह बँक व्याजदरामध्ये कमी करण्याची शक्यता जाणकारांकडून व्यक्त होत आहे असे झाले तर सोने दिवाळी पूर्वी 80 हजार रु. तोळा तर चांदी 1 लाख रु. किलो होऊ शकते असे किरण आळंदीकर यांनी सांगितले.