सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
निरा : विजय लकडे
नीरा परिसरामध्ये रात्री झालेल्या सोसाट्याच्या वादळी वाऱ्याने जोरदार तडाका बसला आहे. रात्री नऊच्या दरम्यान सुरू झालेल्या वादळी वाऱ्याने निरा परिसरात अनेक झाडे ऊन मळून पडली रोडच्या कडेला फळ विक्रेत्यांनी केलेली दुकाने व त्यावरील झाकण्यासाठी का टाकलेले कागद वादळी वाऱ्यात दूरवर फेकले गेले फळ विक्रेत्यांचा माल पावसात भिजून त्यांचे नुकसान झाले.
नीरा लोणंद मार्गावरती रात्रीच्या वाऱ्याने अनेक झाडे पडली असल्याने वाहतूक जवळजवळ तीन तास ठप्प झाली. पाडेगाव येथील 40 ते 50 युवकांनी स्वतः रात्री मशीनच्या साह्याने झाडे बाजूला करून रस्ता मोकळा करण्यास मदत केली. यामुळे या मार्गावरील वाहतूक सुरळीत झाली. निरा येथील सर्वोदय सोसायटी मधील प्रताप देशमुख वय 32 या युवकाचा रात्रीच्या वेळी वादळी वाऱ्यामध्ये टू व्हीलर वर घरी जात असताना वाऱ्याच्या वेगामुळे मुस्लिम दफनभूमी शेजारी झाडात घुसल्यामुळे जोरदार मार लागला त्यास रात्रीच लोणंद येथील खाजगी दवाखान्यात दाखल केले असता पुढील उपचारासाठी पुणे येथील सरकारी दवाखान्यात दाखल केले. नींबूत लक्ष्मी नगर येथील रमेश जाधव यांच्या घरावरील पत्रा उडून गेल्यामुळे त्याचा संसार उघड्यावर पडला आहे. अनेक शेतकऱ्यांची पिके भुई सपाट झालेले आहेत. पाऊस कमी आणि वारा जास्त यामुळे उभी पिके जमीन दोस्त झालेली आहेत. रात्रीच्या जोरदार वाऱ्याने निरा. पाडेगाव. पिंपरे निबूत. येथील शेतकरी हवालदिल झाला आहे वादळी वाऱ्याने अनेक खांब उमळून पडल्याने रात्रभर बत्ती गुल झाली आहे. अनेकांच्या गोठ्यावरील छप्पर उडून गेले आहे या वादळी वाऱ्याचा तडाका अनेक पोल्ट्री धारकांना देखील बसला आहे वाऱ्याच्या वेगामुळे अनेकांच्या पोल्ट्री शेडमध्ये पाणी शिरल्यामुळे. पोल्ट्री चालकांचे देखील नुकसान झाले आहे.
COMMENTS