Baramati News l बारामती तालुक्यात मुरूम, पळशी, लोणीभापकर परिसरात पुन्हा ड्रोनच्या घिरट्या

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम----
सोमेश्वरनगर :  प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील मुरूम, वाणेवाडी, पळशी व लोणीभापकर परिसरात पुन्हा ड्रोनच्या घिरट्या सुरू झाल्या असून नागरिकांच्यात भीतीचे वातावरण आहे. 
       मागील महिन्यात बारामती, दौंड व इंदापूर तालुक्यात ड्रोन फिरत होते. फलटण तालुक्यातील काही गावात देखील रात्रीच्या वेळी ड्रोन पाहिले गेले आहेत. 
         मात्र नक्की हे ड्रोन कोणाचे आहेत हे प्रशासन व पोलिसांनाही याची कल्पना नाही. त्यामुळे नागरिक अधिकच भयभीत झाले आहेत. सोशल मीडियावर वारंवार अफवा पसरल्या जात असल्याने नागरिकांना रात्र जागून काढावी लागत आहे. या अगोदर बारामती, दौंड, इंदापूर तालुक्यात रात्रीच्या वेळी अज्ञात ड्रोन फिरत होते. त्यानंतर बारामती तालुक्याच्या पश्चिम भागात हे ड्रोन कॅमेरे दिसू लागले आहेत. वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याकडून या ड्रोनचा तपास सुरू आहे मात्र यामध्ये यश येताना दिसत नाही. इतक्या रात्री हे ड्रोन नेमकी कशाची टेहळणी करत आहेत याबाबत नागरिकांच्यात उलट सुलट चर्चा आहेत.
To Top