सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
निरा : विजय लकडे
पुरंदर तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या निरा ग्रामपंचायत सदस्य संदीप धायगुडे यांनी आपल्या ग्रामपंचायत सदस्य पदाचा राजीनामा ग्रामविकास अधिकारी महेश राऊत यांच्याकडे दिला.
सुमारे तीन वर्षांपूर्वी अत्यंत अटीतटीच्या झालेल्या ग्रामपंचायती निवडणुकीमध्ये वॉर्ड नंबर पाच मधून मोठ्या मताधिक्याने संदीप धायगुडे निवडून आले होते स्वतंत्र भैरवनाथ पॅनलच्या माध्यमातून या वार्डातून आपले तीनही उमेदवार त्यांनी निवडून आणले होते. निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप यांच्या सूचनेनुसार त्यांनी निरा विकास आघाडीला पाठिंबा देऊन सत्तेमध्ये सहभागी झाले होते
वार्ड नंबर पाच मधील विकास कामे करताना होत असलेला दुजाभाव. नागरिकांच्या मूलभूत गरजा असलेली विकासाची कामे होत नसल्याने वार्डातील नागरिकांची किरकोळ कामे ही होऊ शकत नाहीत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न एखाद्या महिलेच्या जीवावर बेतू शकतो ही लाजिरवाणी गोष्ट आहे.या कारणांमुळे मी आपल्या पदाचा राजीनामा देत आहे असे त्यांनी 'सोमेश्वर रिपोर्टर'शी बोलताना सांगितले.