भय इथले संपत नाही...! निवडणुका संपल्या असतील तर रात्री फिरणाऱ्या ड्रोनकडे जरा लक्ष द्या : इथं लोकांना भयभीत अवस्थेत रात्र जागून काढावी लागतेय

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
बारामती : महेश जगताप
बारामती, दौंड, इंदापूर व फलटण तालुक्यात मध्यरात्री उडणारे ड्रोन नक्की कोणाचे...?? याबाबत अजून कोणालाही थांगपत्ता लागला नसून पोलीस प्रशासन हतबल झाल्याचे दिसत आहे. तर दुसरीकडे लोकांना भीतीपोटी रात्र जागून काढावी लागत आहे. 
           मागील महिनाभरापासून बारामती,पुरंदर, दौंड, इंदापूर व फलटण तालुक्यातील गावांमधून रात्रीच्या वेळी ड्रोन उडताना दिसत होते तशाच प्रकारचे ड्रोन आता फलटण तालुक्यातील ग्रामीण भागात दिसत आहेत  फलटण तालुक्यातील साखरवाडी, जिंती, खुंटे,  खराडेवाडी खामगाव, मुरूम, सुरवडी, गिरवी,तावडी, नवामळा शेलारवस्ती या गावांमध्ये रात्रीच्या सुमारास आकाशात एकापेक्षा जास्त ड्रोन उडत असताना नागरिकांना दिसले आहेत मात्र हे ड्रोन नक्की कोण उडवते? त्याचा हेतू काय? कोणत्या ठिकाणाहून उडवले जाते याचा कोणताच ठाव ठिकाणा पोलिस व प्रशासनाला  लागला नाही मात्र या ड्रोन मुळे चोऱ्या होत असल्याच्या बातम्या या अफवा असल्याच्या व फलटण तालुक्यात अशा प्रकारच्या चोरीची एकही घटना घडली नसल्याचे पोलीस उप विभागीय अधिकारी राहुल धस यांनी सांगितले मात्र रात्री अपरात्री आकाशात दिसणाऱ्या या ड्रोन मुळे फलटण तालुक्यातील ग्रामीण भागात सध्या घबराटीचे वातावरण पसरले आहे. 
             ड्रोन कॅमेऱ्यांबाबतचे व्हिडिओ  सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत चोऱ्या करण्यासाठी हे ड्रोन चोरटे उडवत आहेत अशी चर्चा सध्या तालुक्यातील प्रत्येक गावात सुरू आहे हे ड्रोन कॅमेरे का फिरत आहेत याची पोलिसांनाही कल्पना नाही. त्यामुळे नागरिक अधिकच भयभीत झाले आहेत. सोशल मीडियावर वारंवार अफवा पसरल्या जात असल्याने नागरिकांना रात्र जागून काढावी लागत आहे. काही गावांमध्ये नागरिक रात्रगस्त घालून रात्र जागून काढीत आहेत  ड्रोन कॅमेरे नक्की कोण व कशासाठी उडवीत आहेत याचा तातडीने तपास करण्याची मागणी ग्रामस्थ करत आहेत.
          या अगोदर पुणे जिल्ह्यातील बारामती, पुरंदर, दौंड व इंदापूर या तालुक्यातील काही गावांमधून रात्रीच्या वेळी हे ड्रोन उडताना दिसत असल्याने तिथेही नागरिकांच्यात भीतीचे वातावरण पसरले आहे त्यामुळे पालकमंत्री  उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत पुण्याचे पोलीस अधीक्षक यांना पथक नेमून याबाबतची सखोल चौकशी करण्याची सूचना केली आहे. 
To Top