सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
पुणे सातारा महामार्गावरील किकवी ता.भोर येथे कंटेनर ट्रकने एक्टिवा मोटर सायकलला दिलेल्या धडकेत मोटरसायकलवरील एक महिला जागीच ठार तर एक जण किरकोळ जखमी झाल्याची घटना शुक्रवार दि.१४ घडली.याबाबत अश्विनी भामरे यांनी राजगड पोलीस स्टेशनमध्ये कंटेनर ट्रक चालक अल्ताफ मेहबूब मुजावर वय -४८ रा. महागाव पो. क्षेत्रमाहूली ता.जि.सातारा यांच्याविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार साताऱ्याहून पुण्याकडे जाणाऱ्या कंटेनर एमएच ११ सीयच ४२७९ याने महामार्गावर किकवी गावाच्या हद्दीतील उड्डाणपुलावर दि.१४ रात्रीच्यावेळी एक्टिवा मोटरसायकल एमएच -११- डीजे ६०४८ यांना पाठीमागून धडक दिली. अपघातात एक्टिवा मोटरसायकल वरील मनीषा बबन मकवाने वय -४० या महिलेचा जागीच मृत्यू झाला.तर फिर्यादी यांच्या पतीचा योगेश भामरे यांना किरकोळ जखमी करून मोटरसायकलचे नुकसान केले आहे.याची फिर्याद राजगड पोलीस स्टेशनमध्ये अश्विनी भामरे यांनी दिली.पुढील तपास राजगड पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई अंबादास बुरटे करीत आहेत .
COMMENTS