पुरंदर l पिंपरे खुर्द येथे चिमुकल्यांचे उत्साहात स्वागत : पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक आणि साहित्यांचा वाटप

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
निरा : विजय लकडे
राज्यभरात आज नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाले असून राज्यभरातल्या शाळा आज सुरू झाल्या आहेत.पुरंदर तालुक्यातील पिंपरे खुर्द येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आणि बाबालाल काकडे देशमुख विद्यालयातील विद्यार्थ्यांचं स्वागत सरपंच राजेंद्र गायकवाड यांच्या हस्ते गुलाब पुष्प देऊन करण्यात आले.
           जवळपास दीड महिन्याची उन्हाळी सुट्टी संपल्यानंतर आज विद्यार्थी शाळेमध्ये दाखल झाले होते. त्यामुळे आज शाळांचा परिसर विद्यार्थ्यांनी गजबजुन गेला होता. पुरंदर तालुक्यातील पिंपरे खुर्द येथील आदर्श शाळा म्हणून ओळख  असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये नवागत विद्यार्थ्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. पहिली मध्ये प्रवेश घेतलेल्या  विद्यार्थ्यांचं  स्वागत गुलाब पुष्प देऊन करण्यात आले.तर पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत शालेय पुस्तकांचे व शालेय साहित्याच वाटप करण्यात आले. नीरा केंद्राचे केंद्र प्रमुख महादेव माळवदकर पिंपरे खुर्दचे  सरपंच राजेंद्र गायकवाड ,सामाजिक कार्यकर्ते संतोष थोपटे, मुख्याध्यापक कैलास नेवसे, शिक्षक पालक व शालाव्यावस्थपण समितीचे सदस्य उपस्थित होते.
        पिंपरे  येथील ही जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा  राज्यात उपक्रमशील शाळा म्हणून नावलौकिक मिळालेली शाळा आहे. या शाळेत 274 विद्यार्थी प्राथमिक शिक्षण घेत आहेत. तालुक्यात जास्त पटसंख्या असलेल्या काही मोजक्याच शाळा आहेत.यामध्ये या प्राथमिक शाळेचा नंबर लागतो.शैक्षणिक गुणवत्ता चांगली असल्यामुळे पिंपरे खुर्दच नव्हे तर परिसरातील अनेक भागातील पालक या प्राथमिक शाळेमध्ये मुलांना शिक्षणासाठी पाठवत असतात.
To Top