पुरंदर l शाळेच्या पहिल्या दिवशी शिक्षक समितीचे आंदोलन : विद्यार्थी हिताच्या मागण्यांकडे शासनाकडून दुर्लक्षाचा आरोप

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
पुरंदर : प्रतिनिधी  
शासनाचे विद्यार्थी हिताच्या मागण्याकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्यामुळे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती पुरंदर शाखेच्या वतीने पुरंदर तहसील कार्यालयासमोर लक्षवेधी आंदोलन करण्यात आले.
पुरंदर तालुका प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन महसूल नायब तहसीलदार मिलिंद घाडगे यांना देण्यात आले.
    राज्य शासनाने शिक्षक निश्चिती व संच मान्यतेच्या सबंधाने १५ मार्च २०२४ रोजीच्या शासन निर्णयामुळे अनेक मुख्याध्यापक व शिक्षक अतिरिक्त होणार आहेत. निवृत्त शिक्षकांना कमी पटाच्या शाळेवर नेमणूक करण्याचा निर्णय अत्यंत चुकीचा घेतलेला आहे. हे धोरण पहिली ते पाचवी व सहावी ते आठवी मधील विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीच्या दृष्टीने कुचकामी ठरणार आहे. तो निर्णय मागे घ्यावा तसेच नवभारत साक्षरता अभियान हे शिक्षकांच्या दैनंदिन अध्यापनावर परिणाम करणारे आहे. त्यामुळे हे काम बाह्य यंत्रणेच्या मार्फत राबवण्यात यावे. अशा मागण्या पुरंदर तालुका शिक्षक समितीच्या वतीने करण्यात आल्या.
     शिक्षकांना अशैक्षणिक कामाचा तगादा वेळी आणि वेळी-अवेळी माहिती मागवण्याचा हव्यास शैक्षणिक दैनंदिन कामकाजा मध्ये अडसर ठरत आहे. शिक्षकांच्या गणवेशाचा निर्णयही त्यांच्या स्वातंत्र्यावर घाला असून त्यांच्यावर अविश्वास व नकारात्मक दृष्टिकोन निर्माण करणारा आहे. समूहशाळा, दत्तक शाळा योजना व खाजगीकरणाचे धोरण या सर्वांना समितीचा कडाडून विरोध आहे.
    आंदोलनास मोठ्या संख्येने शिक्षक समितीचे शिलेदार उपस्थित होते. यामध्ये महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्य सल्लागार महादेव माळवदकर पाटील, पुणे जिल्हा शिक्षक समिती कोषाध्यक्ष सुनील लोणकर, पुणे जिल्हा शिक्षक समिती महिला आघाडी  सरचिटणीस मधुबाला कोल्हे, जिल्हा प्रतिनिधी सुजाता कुंभार,पुरंदर तालुका शिक्षक नेते लतीफभाई इनामदार, अध्यक्ष सुनिलतात्या कुंजीर, सरचिटणीस भाऊसाहेब बरकडे, कार्याध्यक्ष सुनील जगताप, कोषाध्यक्ष संतोष इनामके, प्रवक्ते कुंडलिक कुंभार,  महिला आघाडी अध्यक्षा आश्विनी शिंदे (गायकवाड), सरचिटणीस निर्मला घाटे, उपाध्यक्षा हिरकणी कुंभार ,कोषाध्यक्ष निर्मला पोमण, पुरंदर तालुका शिक्षक पतसंस्थेचे संचालक मनोजकुमार सटाले ,गणेश कामठे, जिल्हा शिक्षक पतसंस्थेचे संचालक दिनेश दुधाळ पंढरीनाथ काळे ,माजी सभापती सतीशअण्णा कुंजीर, शिक्षक नेते शांगृधर कुंभार ,धनंजय साबळे ,संदिप कुंभार, संजय तांबेकर, उदय पोमण, मारुती शेंडकर, अनिल गायकवाड, निजाम मुलाणी चंद्रकांत शिंदे, रियाज तांबोळी आदींचे शिक्षक समितीचे संघटक उपस्थित होते. 
    यावेळी महादेव माळवदकर पाटील, सुनीलतात्या कुंजीर, अश्विनी शिंदे यांनी मनोगते व्यक्त केली.
     कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनीलतात्या कुंजीर यांनी केले. सूत्रसंचालन सुनील लोणकर यांनी केले. आभार गणेश कामठे यांनी मानले.
To Top