सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
माळेगांव : सतीश गावडे
बारामती तालुक्यातील पाहुणेवाडी येथील तावरे वस्तीमधील बंद घरात भर दिवसा घरफोडी करुन अज्ञात चोरांनी रोख रक्कम व सोन्याचे दागिनेसह दोन लाख पंचावन्न हजार रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला.
याबाबत चंद्रकांत बाळासो जाधव (रा.तावरेवस्ती ,पाहुणेवाडी ता.बारामती) यांनी फिर्याद दिली असून माळेगांव पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादी हे शिक्षक असुन ते आई -वडील आणी पत्नीसह रहात आहेत.शेजारी लग्नाची पुजा असल्याने फिर्यादीची आई घराला कुलूप लावून गेल्या होत्या.
दि.(०७ ) रोजी दुपारी दीड वाजता फिर्यादीचे वडील घरी आले असता त्यांच्या घराचा दरवाजा उचकटल्याचे दिसुन आले.यावेळी घराची पाहणी केली असता चोरट्यांनी घरातील रोख रक्कम तीस हजार व दोन लाख पंचवीस हजार रुपयांचे साडे चार तोळे वजनाचे सोन्याचे दागिने चोरुन नेल्याचे दिसुन आले.
सदर चोरीचा तपास उपनिरीक्षक अमोल खटावकर करीत आहेत.
COMMENTS