सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्या अंतर्गत येणाऱ्या गावांमधून मागील काही दिवसात चोरट्याने उच्छाद मांडला असून पोलीस चोरट्यांना पकडण्यात व चोऱ्या रोखण्यात अपयशी ठरले आहेत.
सोमेश्वरनगर परिसर, वडगाव निंबाळकर, मुढाळे, निंबुत-फरांदेनगर तर आज कोऱ्हाळे खुर्द या ठिकाणी आपला हात साफ केला आहे. काल निंबुत-फरांदेनगर येथे दिवसाढवळ्या चोरी झाल्याचा प्रकार घडलेला आहे. तर आज दुपारी ठीक चार वाजता कोऱ्हाळे खुर्द नजीक चव्हाणवस्ती येथे बाळासो कोळेकर यांच्या घरी चोरी करण्यात आली आहे. नक्की या चोरीत किती सोने व रोख रक्कम गेली आहे याबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात येत आहे.
तसेच नागरिकांमध्ये ड्रोनची जास्ती रात्रभर गस्त घालावी लागत आहे. रात्रीची चोरी हे गेल्या १५ दिवसांपासून घडत असून काल पासून चोरट्यांनी दिवसाढवळ्याच घरे फोडण्यास सुरुवात केली आहे. तसेच मागील काही दिवसांपासून आकाशात ड्रोन उडताना दिसत आहेत त्यामुळे नागरिकांना रात्रभर जागे राहून गस्त घालावी लागत आहे. हाकेच्या अंतरावर असलेले पोलीस स्टेशन तरीही चोरांच्या मनात पोलिसांविषयी कसलीच भीती राहिलेली नाही. दिवसाढवळ्या चोरी झालेली पाहून नागरिकांमध्ये अजूनही भीतीचे वातावरण निर्माण तयार झाले आहे. झालेल्या चोरीचा तपास पोलीस यंत्रणा करत आहे.
COMMENTS