मटका अड्ड्यावर पोलिसांनी धडक कारवाई करत रोख रकमेसह एक लाखांचा मुद्देमाल केला जप्त : सात जणांवर गुन्हा दाखल

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
लोणावळा : श्रावणी कामत 
लोणावळा उपविभागाचे सहा. पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांनी उपविभागातील अवैध धंद्यांवर व गुन्हेगारांवर कायदेशीर कारवाईची मालिका सुरूच ठेवली आहे.
         सत्यसाई कार्तीक यांना गुप्त बातमीदारामार्फत अशी बातमी मिळाली होती की , वडगाव मावळ पोलीस स्टेशन हद्दीतील कान्हे फाटा येथे अवैधरित्या मटका अड्डा सुरू आहे. त्यावरून सहा.पोलीस अधीक्षक श्री सत्यासाई कार्तीक यांनी दि ७ रोजी त्यांचे पथकाला मिळालेल्या बातमीचे ठिकाणी पाठवले असता कान्हे फाटा रेल्वे स्टेशन जवळ, आबा सातकर यांचे चाळीतील खोलीसमोरील मोकळ्या जागेत पथकाने टाकलेल्या छाप्यामध्ये काळूराम पांडुरंग लालगुडे, वय ३१ वर्ष, रा.कुसगाव, ता. मावळ,जि पुणे , कृष्णा धारोबा जाधव, वय २४ वर्ष रा. कान्हे फाटा,तालुका मावळ जिल्हा पुणे किसन जवेरी कोळी, वय ६५ वर्ष, रा कान्हे फाटा, ता.मावळ जि.पुणे,  विलास सोपान बोरडे, वय ५८ वर्ष, रा. कान्हे फाटा, ता.मावळ, जि पुणे, किरण विजय यादव, वय ३२ वर्ष, रा.कामशेत, तालुका मावळ जिल्हा पुणे,  राकेश जेकुप्रसाद यादव वय ५८ वर्ष, रा.कान्हे फाटा, मावळ जिल्हा पुणे हे कल्याण नावाचा मटका खेळताना मिळून आले असून त्यांचेकडे केलेल्या प्राथमिक चौकशीमध्ये सदरचा मटका अड्डा हा मदन वाजे, रा.तळेगाव दाभाडे (पुर्ण नाव पत्ता माहीत नाही) हा चालवत असल्याचे निष्पन्न झाले आहे. 
           सदर इसमांचे  ताब्यातून रोख रक्कमेसह एकूण रु.92,890/- (अक्षरी ब्याणव हजार आठशे नव्वद रु.) एवढ्या किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदरबाबत वडगाव मावळ पोलीस स्टेशन येथे पोलिसांनी दिलेल्या फिर्यादीवरून  महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम चे विविध कलमान्वये वर नमूद सात जणांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास वडगाव मावळ पोलीस करत आहेत.
        सदरची कारवाई पुणे ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांचे मार्गदर्शनाखाली लोणावळा उपविभागाचे सहा.पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक, पोसई शुभम चव्हाण,पो.हवा अंकुश नायकुडे, पो.हवा नितेश (बंटी) कवडे, पो.कॉ गणेश येळवंडे व वडगाव मावळ पो. स्टे कडील पोलीस पथकाने केली आहे.
To Top