सोमेश्वर रिपोर्टर टीम----
भोर : संतोष म्हस्के
भोर तालुक्यातील हिरडस मावळ खोऱ्यातील निरा निवंगण ता.भोर येथे शुक्रवार दि.८ रोजी सकाळी- सकाळी सहाच्या सुमारास अलका लक्ष्मण डोईफोडे यांच्या घरामध्ये बिबट्या घुसून लहान मुले व वयोवृद्ध आजी झोपलेल्या असताना त्यांच्या बिछान्यावरून बिबट्याने घरात प्रवेश करीत व पाळीव जनावरांवर हल्ला केला.
सुदैवाने यामध्ये कोणतेही जनावर दगावले नाही परंतु जखमी झाले आहेत. सदरील माहिती अलका डोईफोडे यांनी निवंगण गावचे सरपंच राजू दिघे तसेच माजी सरपंच किसन दिघे यांना दिल्यानंतर यांनी प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन पाहणी केली व सदर घडलेली घटना वन विभागाला कळविली.अशा प्रकारच्या घटना वारंवार या भागात घडत असतात. वनविभागाने त्वरित बिबट्याचा बंदोबस्त करावा व अलका डोईफोडे यांच्या पाळीव जनावरांवर झालेल्या हल्ल्याची पाहणी व चौकशी करून त्वरित नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
COMMENTS