निधन वार्ता l सायंबाचीवाडी येथील परशुराम जगताप यांचे निधन

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
मोरगाव : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील सायंबाचीवाडी   येथील परशुराम आबाजी जगताप वय ९४ यांचे वृद्धपकाळाने नुकतेच  निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, चार मुले, एक मुलगी,सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
         परशुराम जगताप यांनी शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी या परीसरात मोलाची कामगिरी केली आहे. सण 1989 सायंबाचीवाडी येथे  स्वयंभूनगर विविध  कार्यकारी सहकारी सोसायटी स्थापन केली होती. या  संस्थेवर संस्थापक अध्यक्ष असताना त्यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी  अनेक भरीव व मोलाची  कामगिरी केली होती. एक मनमिळावू, उदार व्यक्तिमत्त्व म्हणून  म्हणून ते सर्वदूर परीचीत  होते. सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी.पी. जगताप, राजेंद्र जगताप, सुभाष जगताप,  सुदाम जगताप व विमल कदम  यांचे ते वडील होत. तर उद्योजक निलेश जगताप व प्रमोद जगताप यांचे ते आजोबा होत. त्यांच्या निधनामुळे परीसरातुन हळहळ व्यक्त केली जात आहे.
To Top