राजगड l मिनल कांबळे l शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी भरली शाळेतील गरजू चाळीस विद्यार्थ्यांची फी : दापोडेत माजी विद्यार्थी मेळावा सपन्न

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
वेल्हे ; मिनल कांबळे
राजगड तालुक्यातील नरवीर तानाजी मालुसरे विद्यालय दापोडे येथील ४० विद्यार्थ्यांची फी माजी विद्यार्थ्यांनी भरली आहे. 
राजगड ज्ञानपीठाचे नरवीर तानाजी मालुसरे विद्यालय दापोडे येथे दहावी सन २००८-०९ या बॅंचचा माजी विद्यार्थी मेळावा नुकताच पार पडला. या वेळी तानाजी मालुसरे विद्यालयातील ज्या विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती नाजुक आहे आणि त्यांना शाळेची फी भरणे शक्य नाही अश्या ४० विद्यार्थ्यांची फी  शाळेचा माजी विद्यार्थी सॉफ्टवेअर इंजिनिअर सचिन शेंडकर यांनी शाळेचे मुख्याध्यापक बी.एस. पवार यांच्याकडे सुपूर्द केली.या वेळी शाळेचे सर्व माजी शिक्षक उपस्थित होते. यावेळी मुख्याध्यापक पवार म्हणाले कि परीसरुपी सचिनसारखी मुलं समाजाला नवी दिशा देत समाजातील उपेक्षित, हुशार आणि गरजू विद्यार्थ्यांच्या जीवनाचे नक्की सोनं करतील, यात तिळमात्र शंका वाटत नाही.
To Top