सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
भोर मांढरदेवी ता.भोर मार्गावरील म्हस्केनगर येथे असलेल्या सोहम बेकरीमध्ये मूळचा असणारा उत्तर प्रदेशच्या कामगाराने शुक्रवार दि.७ पहाटेच्यावेळी बेकरीतील रोख रक्कम तसेच इतर दोन ते तीन हजारांचे साहित्य घेऊन पसार झाल्याची घटना घडली.आजाद अन्सारी (उत्तर प्रदेश) असे पळून गेलेल्या कामगाराचे नाव आहे.
सोहम बेकरी मध्ये काही दिवसांपासून अन्सारी हा केक बनवण्याचे काम करीत होता. शुक्रवारी पहाटे त्याने बेकरीच्या चाव्या तसेच ७ हजार २२० रुपये व बेकरीतील महत्त्वाच्या वस्तू घेऊन पळून गेला.यामुळे बेकरी मालकाचे नुकसान झाले आहे.