सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
मागील चार ते पाच वर्षांपासून फक्त लग्न समारंभात दिसणारा ड्रोन आठ दिवसांपासून भोर तालुक्याच्या दक्षिणेकडील वीसगाव, चाळीसगाव खोऱ्यात परिसरात रात्रीच्या वेळी गिरठ्या घालत फिरत आहे.साधारणतः चार ते पाच तास ड्रोन ठीक ठिकाणच्या गावांवर फिरत असल्याने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण आहे.
भोर तालुक्याचे दक्षिणेकडील वीसगावच्या धावडी, पळसोशी ,वरवडी ,पाले तर चाळीसगाव खोऱ्यातील आंबवडे ,कारी ,टीटेघर, कर्णावड,करंजे ता.भोर येथील परिसरात आठ दिवसांपासून रात्री १० वाजले नंतर ड्रोन घिरठ्या घालत आहे.यापूर्वी कधीही ड्रोन रात्रीच्या वेळी परिसरात फिरत नव्हता.अचानक ड्रोनच्या घिरठ्या सुरू झाल्या आहेत.का आणि कशासाठी ड्रोन येथील परिसरात घिरठ्या घालित आहे याचा उलगडा नागरिकांना होत नसल्याने नागरिक हवालदील झाले आहेत.तरुण वर्ग गिरठ्या घालणाऱ्या ड्रोनवरती लक्ष ठेवून असला तरी काही वेळाने ड्रोन इकडून तिकडे तिकडून इकडे फिरत असल्याने तरुणांना ही काही समजेनासे झाले आहे.रात्रीच्या एक वाजेपर्यंत ड्रोनच्या घेरट्या सुरूच असतात.ड्रोन परिसरात फिरत असल्याची कल्पना रात्रगस्त घालणाऱ्या भोर पोलिसांना देण्यात आली आहे.ड्रोन वरवडी,आंबवडे परिसरात फिरत असल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे.आम्ही त्या परिसरातील गावोगावच्या पोलीस पाटलांना चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.लवकरच ड्रोन कोणाचे आणि का रात्रीच्या वेळी फिरत आहेत याची माहिती घेऊन ड्रोन फिरवणारांवर कारवाई करणार आहोत असे पोलीस निरीक्षक अण्णा पवार यांनी सांगितले.
--------------------
ड्रोन फिरतोय ,कोण करणार चौकशी?
आंबवडे, वरवडी,कती परिसरात आठ दिवसांपासून रात्रीच्या वेळी ड्रोन घिरठ्या घालत आहे. नागरिक भयभीत झाले आहेत.ड्रोन का कशासाठी आणि कोणाचे फिरत आहेत याची चौकशी कोण करणार असा प्रश्न नागरिकांमध्ये उपस्थित झाला आहे असे आंबवडे ता.भोर येथील तरुण उमेश जेधे यांनी सांगितले.
COMMENTS