Baramati Breaking l पिण्याच्या पाण्याची मोटार जोडताना विजेचा शॉक लागून एकाचा मृत्यू : मोरगाव येथील घटना

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
मोरगाव : मनोहर तावरे
बारामती तालुक्यातील मोरगाव येथे काल एक दुर्दैवी घटना समोर आली. पिण्याच्या पाण्यासाठी मोटर जोडत असताना अचानक विजेचा शॉक लागून एका युवकाचा मृत्यू झाला आहे. येथील गणेश रमेश केदारी (वय- ४३वर्षे ) असे या घटनेतील मृताचे नाव आहे. या अनपेक्षित घटनेमुळे संपूर्ण मोरगाव परिसरात काल शोककळा पसरली.

       मोरगाव मंदिराच्या जवळ या तरुणाचे हार दुर्वा व पेढे फुले विक्रीचे दुकान आहे. दुपारी घराजवळ नळाला पाणी आल्यानंतर पाणी भरण्यासाठी गेले असता हा दुर्दैवी अपघात घडला. या घटनेमुळे संपूर्ण पोरगा परिसरात सुखकळा पसरली होती. या घटनेतील मृत गणेश केदारी यांना मृत्युपश्चात पत्नी एक मुलगी व दोन महिन्याचा लहान मुलगा तसेच आई-वडील व भाऊ असा परिवार आहे.
To Top