सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
भोर - विभाग ता.भोर विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी चंद्रकांत जयवंत बांदल तर व्हाईस चेअरमन सुरेश गोपाळ धोत्रे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
शिवाजी रामचंद्र थोपटे यांनी चेअरमनपदाचा तर रुक्मिणी बांदल यांनी व्हाईस चेअरमन पदाचा राजीनामा दिल्याने ही निवडणूक घेण्यात आली.चेअरमन पदासाठी चंद्रकांत बांदल तर व्हा.चेअरमन साठी सुरेश धोत्रे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड केली गेली.निवडणूक सहाय्यक निबंधक बाळासाहेब तावरे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली असून निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून संजय पवार यांनी काम पाहिले.यावेळी राजगड संचालक उत्तम थोपटे, सामाजिक कार्यकर्ते रोहिदास बदक, भरत नांगरे,संचालक सुनील पवार ,राजू बांदल, धोंडीबा हूंबे ,गणेश गायकवाड ,बाजीराव नांगरे ,किसन बांदल ,सचिव महेंद्र तावरे आदिसह सर्व संचालक उपस्थित होते.
COMMENTS