khandala Breaking l लिफ्ट देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार : आरोपी लोणंद पोलिसांच्या ताब्यात

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
लोणंद : प्रतिनिधी
लोणंद गावच्या हद्दीत पालखीच्या दर्शनासाठी आलेल्या अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी राकेश भगवान भंडलकर वय 25रा तांबवे ता फलटण हल्ली रा ताथवडा ता फलटण याच्यावर लोणंद पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
        याबाबत लोणंद पोलीस स्टेशनवरून मिळालेली अधिक माहीती अशी की लोणंद पोलीस ठाणे हृददीत दि.०६.०७.२०२४ रोजी श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचे पालखीचे दर्शनासाठी आलेल्या भाविकामधील एका कुटूंब पती पत्नी व एक १३ वर्षाची लहान मुलगी असे दर्शन घेवुन दिनांक 0७/o७/২০२४ रोजी पहाटे १.३० वा घरी जात असताना त्यांना पहाटे लिफट देण्याच्या बहाण्याने बजाज पल्स मोटार सायकल वरुन एका इसमाने त्यांना मी त्याच भागात जात आहे तुम्हाला सोडतो असे सांगुन त्यातील मुलगी व तीची आई यांना मोटार सायकल वर बसवुन पाडेगाव टोल नाका येथे गेल्यावर महीलेस खाली उतरवुन मुलीस घेवुन पोबारा केला त्याच वेळी मुलीचे आई वडीलांचे लक्षात आलेवर त्यांनी पोलीस स्टेशनला अल्पवयीन मुलीस वाईट हेतुने पळवुन नेलेबाबत गुन्हां दाखल केला होता.
   सदर गुन्ह्याचे गांभिय लक्षात घेवुन लोणंद पोलीस स्टेशन कड़ील गुन्हे प्रकटीकरण पथकास अल्पवयीन मुलीचा व आरोपीचा  शोध सुरु असताना अल्पवयीन मुलीस दिनांक ०७/০७/२०२४ रोजी दुपारी संशयित आरोपीने पाडेगाव ता. खंडाळा गावचे हद्दीत रोडवरील रसवंतीजवळ आडमार्गानि येऊन  सोडुन पसार झाला होता. त्यानंतर सदर बातमी मिळताच पिडीतेस आज्ञात आरोपी बाबत विचारपुस केली परंतु सदर पिडीत मुलगी ही अतिशय घाबरलेली होती व कोणतीही घटना सांगणेच्या परिस्थितीत नव्हती.अज्ञात आरोपीने तीला घेवुन जाताना आडमार्गचा वापर करुन तीचेवर अत्याचार केला व केलेल्या अत्याचाराबाबत जर कोणास काही एक सांगीतले तर तीला व तीचे घरातील लोकांना जिवे मारण्याची धमकी दिली त्यामुळे पिडीतेने घाबरुन दोन दिवस काही एक सांगीतले नाही. मा.उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.राहल धस सो, यांनी अज्ञात आरोपीचा शोध धेण्यासाठी लोणंद पोलीस स्टेशन, स्थानिक गुन्हे शाखा सातारा, फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन व फलटण शहर पोलीस स्टेशन कडील गुन्हे प्रकटीकरण शाखेची वेगवेगळी पथक तयार करुन त्यांना मार्गदर्शन करुनआरोपीचा शोध घेण्याच्या सुचना दिल्या. सदर सर्व पथकांने सीसीटीव्ही फुटेज व गोपणिय माहीतीचे
आधारे अतोनात प्रयत्न केले परंतु पिडीत मुलीला  अज्ञात आरोपीने आडमागनि नेले असल्यामुळे तीला
काहीही उपयुक्त माहिती सांगता येत नव्हती.
दिनांक १४/o७/२०२४ रोजी लोणंद पोलीस ठाण्याचे  सुशिल भोसले, सहाय्यक पोलीस निरिक्षक व गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अंमलदार यांनीसदर पिडीतेचे व्यवस्थितरित्या समुपदेशन करुन तीला विश्वासात घेवुन विचारपुस केली व वेगवेगळे बारचे फोटो दाखविले असता त्यातील एक  हॉटेल ओळखीचे दिसल्याने त्यामधील फु्टेजची पाहणी करुन अज्ञात आरोपीची ओळख पटली त्यानंतर वरिष्ठांचे मार्गदर्शनावरून  लोणंद पोलीस ठाण्याचे सपोनि  सुशिल भोसले, व गुन्हें प्रकटीकरण शाखेचे अंमलदार पोहवा सर्जेराव सुळ  संतोष नाळे विठ्ठल काळे  केतन लाळगे गोविद आंधळे  सुनिल नामदास अभिजित घनवट यांनी साफळा रचुन आरोपीचा पाठलाग करुन राकेश भगवान भंडलकर यास  ताब्यात घेतले,  सदर आरोपीस न्यायालयात भेटविले असतादिनांक २२/o७/२०२४ रोजीपर्यत त्यास पोलीस कस्टडी मिळाली आहे. 

To Top