सोने खरेदी करणारांसाठी गुड न्युज ! सोने तोळ्याला चार हजारांनी तर चांदी किलोला आठ हजारांनी स्वस्त

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
बारामती : प्रतिनिधी
आज केंद्रीय अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी बजेट जाहीर केले या बजेट मध्ये सोने-चांदी वरील आयातशुल्क १० टक्के वरून ५ टक्के केले असून कृषी उपकर ५ वरून १ टक्का केला आहे त्यामुळे यापूर्वी सोने चांदीवर एकूण १५ टक्के आयातशुल्क लागू होते ते ९ टक्क्यांनी कमी होऊन ६ टक्के आयातशुल्क आकारले जाणार असल्याने आज सोने - चांदी बाजारात सोने तोळ्याला चार हजार रुपयांनी स्वस्त झाले तर चांदीचा भाव हि तोळ्याला आठ हजार रुपयांनी कमी झाला.
          भाव कमी झाल्याने ग्राहकांची खरेदी आणि गुंतवणूक वाढेल असे इंडिया बुलिअन ज्वेलर्स असोसिएशन चे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष किरण आळंदीकर यांनी सांगितले.
नुकतीच IBJA या सराफ असोसिएशन च्या वतीने आयातशुल्क कमी करणे बाबत केंद्र सरकारकडे मागणी करण्यात आली होती ती सरकारने मान्य केल्याने सराफ व्यवसायिकांसह ग्राहकांनी देखील समाधान व्यक्त केल्याचे चे हि आळंदीकर यांनी सांगितले.
याबाबत पुढे बोलताना इब्जा चे पश्चिम महाराष्ट्र संचालक अमृतराज मालेगांवकर यांनी सांगितले कि आयातशुल्का मुळे सोन्याचे भाव सध्या कमी झाले असले तरी भविष्यात आंतरराष्ट्रीय घडामोडी मूळे व सोने - चांदी वर GST शुल्क वाढण्याची शक्यता असल्याने दिवाळीपर्यंत भाववाढ होण्याची शक्यता असून ज्यांचे कडे दिवाळी नंतर लग्न कार्य आहे किंवा ज्यांना गुंतवणूक करायची आहे त्यांना खरेदी साठी हि चांगली संधी आहे.
To Top