सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
भोर तालुक्यात मागील चार दिवसांपासून पावसाचा जोर वाढल्याने पाऊस जोरदार बरसत आहे.मुसळधार पावसामुळे मंगळवार दि.२३ भोर आठवडे बाजारात व्यापारी तसेच ग्राहकांची चांगली तारांबळ उडाली.
आठवडी बाजारा दिवशी सकाळपासूनच पावसाने रिपरीत सुरू केल्याने भाजी व्यापाऱ्यांच्या दुकानांमध्ये पाणी शिरले होते.तर ग्राहकांना भाजी खरेदी करताना रस्त्यावर आलेल्या पावसाच्या पाण्यात भाजीपाला तसेच कडधान्य खरेदी करावे लागले. पाऊस सुरू असताना वारे जोरदार वाहत असल्याने व्यापाऱ्यांनी बांधलेले छत वाऱ्याने उडून गेले होते. दरम्यान दुकानांवर बांधलेले छत वाऱ्याने उडाल्याने बहुतांशी व्यापाऱ्यांचा दुकानातील भाजीपाला तसेच कडधान्य याच्यासह इतर बाजारातील मटेरियल भिजून गेले.आठवडे बाजारात पावसामुळे भाजीपाला भिजल्याने व्यापाऱ्यांना सायंकाळी भाजीपाल्याचे दर कमी करून भाजी विकावी लागली. यामुळे आठवडे बाजारात आलेल्या भाजी विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांचे नुकसान झाल्याचे भाजी व्यापारी गोविंद झांजले यांनी सांगितले.