सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सुपे : दीपक जाधव
बारामती तालुक्यातील सुपे परिसरात जुन महिण्यानंतर पुरेसा पाऊस झाला नाही. त्यामुळे या परिसरातील अद्यापही तलाव कोरडे असल्याने खरिप हंगामातील पिकांना खडकवासला धरणातील ओव्हरफ्लोचे पाणी सोडण्याची मागणी शेतकरी संघर्ष कृती समितीचे अध्यक्ष पोपट खैरे यांनी केली आहे.
मागिल महिण्यात झालेल्या पावसामुळे खरिप हंगामातील बाजरी, कांदा, सुर्यफुल आदी पिके शेतकऱ्यांनी घेतली आहेत. मात्र अपुऱ्या पावसामुळे सुपे परिसरातील तलाव अद्याप कोरडेच आहेत. त्यामुळे पुढे पावसाने दांडी मारल्यास शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला जावु शकतो. त्यामुळे शासनाच्या ' जनाई ' उपसा जलसिंचन योजनेद्वारे खडकवासल्याचे ओव्हरफ्लो होणारे पाणी सोडण्यास परिसरातील तलाव भरल्यास पिकांना जिवदान मिळु शकेल अशी मागणी शेतकरी संघर्ष कृती समितीच्यावतीने करण्यात आली आहे.
दरम्यान खडकवासला कालवा समितीचे सदस्य तथा शेतकरी संघर्ष कृती समितीचे अध्यक्ष पोपट खैरे, दिलीप खोमणे, प्रकाश काळखैरे आणि भाऊसाहेब मोरे आदींनी खडकवास पाठबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता श्वेता कुऱ्हाडे, जनाई उपसा सिंचन योजनेचे कार्यकारी अभियंता दिगंबर दुगल, पाठंधारे विभागाच्या अधिक्षक अभियंता जगताप आदींना यासंदर्भातील निवेदन दिल्याची माहिती खैरे यांनी दिली.
.........................
COMMENTS