सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सुपे : दीपक जाधव
बारामती तालुक्यातील रेशन दुकानातील पीओएस मशीनी बंद पडल्याने लाभार्थ्यांना धान्याचे वाटप होत नसल्याने कुचंबना होत आहे. मागिल आठवड्यापासुन या पीओएस मशीनी बंद आहेत. त्यामुळे तालुक्यातील ८० टक्के लाभार्थी धान्यांपासुन वंचीत राहिले आहे. त्यामुळे या महिन्यातील धान्य वाटपाची मुदत वाढ करुन मिळावी अशी मागणी रेशन दुकानदारांनी तहसिलदार यांना निवेदन देवुन केली आहे.
शासनाने यापुर्वीच्या पीओएस मशीनी बंद करुन नव्या स्वरुपात दिल्या आहेत. मात्र या मशीनीद्वारे एखादा दुसरा दिवस धान्याचे वाटप केल्यावर या मशीनी मागिल आठवड्यापासुन बंदच झाल्या आहेत. त्यामुळे लाभार्थांना धान्याचे वाटप करता येत नाही. धान्य घेवुन जाण्यासाठी रेशन दुकानाकडे लाभार्थांच्या रांगा लागत आहेत. मात्र मशीनी बंद झाल्याने वाटप सुरु करता येत नाही. त्यामुळे लाभार्थी आणि रेशन दुकानदार यांच्यामध्ये खडजंगी होत आहे. त्यातुन दोघांमध्ये वादाचे प्रसंग उद्भवत आहेत. तसेच स्थानिक सामाजिक कार्यकर्ते याबाबत स्वस्तधान्य दुकानदार यांची वरिष्ठांकडे तक्रारी करीत आहेत. तसेच या महिन्याचे धान्य बुडेल काय या भीतीने लाभार्थी त्रस्त झाले आहेत. मात्र या महिण्यातील शेवटचे दोन दिवस राहिल्याने धान्य वाटपाची मुदत वाढ करुन मिळावी असे या निवेदनात म्हटले आहे.
तालुक्याच्या पुरवठा अधिकाऱ्यांकडे याबाबत तक्रार करुनही कुठलीच कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे तालुक्यातील रेशन दुकानदार विजय चांदगुडे, दिलीप जगताप, बाळासाहेब वाघ, मयूर ढवाण, मिलिंद भोपळे, मोहन रणदिवे, सोमनाथ पाटील, कोरडे, क्षिरसागर, रणशिंग आदी दुकानदारांनी थेट तहसिलदारांना निवेदन दिल्याची माहिती रेशन दुकानदार विजय चांदगुडे यांनी दिली.
..........................
COMMENTS