सोमेश्वर रिपोर्टर टीम----
लोणंद : प्रतिनिधी
लोणंद ता. खंडाळा येथील गजबजलेल्या शास्त्री चौक याठिकाणी मालट्रकने चिरडल्याने पादचारी संपत लक्ष्मण ठोंबरे वय ५३ या गृहस्थाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार आज दूपारी चारच्या सुमारास लोणंद येथील शास्त्री चौकात नीरा बाजूकडून साताऱ्याच्या दिशेने जात असलेल्या मालट्रक क्रमांक एम एच 18 बी.जी. 4986 ने पायी चालत जात असलेल्या संपत लक्ष्मण ठोंबरे रा. कोपर्डे ता. खंडाळा या इसमास धडक देऊन चिरडल्याने गंभीर जखमी होवून संपत ठोंबरे हे जागीच ठार झाल्याची घटना घडली. अपघातानंतर लोणंद पोलीसांनी घटनास्थळी भेट देत अपघाताची माहीती घेतली. लोणंद येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या घटनेची नोंद लोणंद पोलिसात करण्यात आली असून चालक राधेश्याम प्रतापसिंह जमरा वय २७ रा. कामठा , जिल्हा धार, मध्यप्रदेश यास ताब्यात घेण्यात आले असून लोणंद पोलिस अधिक तपास करीत आहेत