सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
मेढा : ओंकार साखरे
जावली तालुक्यातील मेढा येथील दोन वर्षासाठी तडीपार असलेला आरोपी कु. गणेश विष्णू शिंदे (वय 23) हा राहणार मेढा ता. जावळी येथील दोन वर्षासाठी जिल्हा हद्दपार असून देखील मेढा पोलिसांची दिशाभूल करत वारंवार त्याच्या राहत्या घरी ये जा करत होता ही बातमी मेढा पोलिस स्टेशनला समजताच सपोनी पृथ्वीराज ताटे यांच्या सहकाऱ्यांनी सापळा रचत आरोपी गणेश शिंदे याला त्याच्या राहत्या घरातून अटक करत ताब्यात घेतले सदर आरोपीवर
पोलिस अधिनियम कायद्या १९५१ चे १४२ कलम १२ अन्वये तडीपारीचा आदेश भंग केल्याप्रकरणी कारवाही करण्यात आली आहे.अधिक तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शिंगटे करत आहेत.
COMMENTS