सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेंङकरवाङी येथील विध्यार्थी वर्गानी आज दिंङी सोहळ्याचे आयोजन केले होते.
शेंङकरवाङी मध्ये टाळ मृदूगांच्या स्वरात, आवाजात विठ्ठल विठ्ठल नामाचा गजर, माऊली माऊली आमचे ज्ञानेश्वर माऊली. हरिनामाच्या गजरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. शेंङकरवाङीतील महिला व ग्रामस्थ युवक शालेय विध्यार्थी यांनी आयोजित केलेल्या सर्व कार्यक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन उपस्थिती दाखवत आसतात. विठ्ठलाची वेशभूषा आर्यन सचिन शेंङकर व रूक्मिनीची वेशभूषा वेदिका तानाजीराव शेंङकर यांनी साकारली होती.
शाळेच्या शिक्षिका श्रीमती हंसा वाळा व अंगणवाङी शिक्षिका रेश्मा शेंङकर यांनी अथक परिश्रम घेऊन मुला मुलींना सर्व बालचमूंना वेषभूषा साठी मेकअप साठी सहकार्य केले. शेंङकरवाङीतील महिला वर्गानी आपल्या घरासमोर सङा रांगोळी काढून व औशन करून बालचमू व दिंङीचे स्वागत केले.
जि.परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक सतिशराव पिसाळ, श्रीमती हंसा वाळा मॅङम शाळेतील स्नेहसंमेलन आसो.किंवा इतर कोणतेही कार्यक्रम आसोत.तसेच शाळेतील विध्यार्थी वर्गाला झोकून देऊन ज्ञानाचे धडे देत आसतात. शेंङकरवाङीतील ग्रामस्थ मंङळी देखील शाळेसाठी भरीव योगदान देतात.
शेंङकरवाङीतील जि.परिषद शाळा एक आदर्श शाळा आहे. सुसज्ज इमारत, सुंदर निसर्ग रम्य शाळेचा परिसर, सर्व सुविधा युक्त शाळा आहे.
शाळेला फक्त नविन शौचालय बांधण्याची आवश्यक्ता आहे.यासाठी करंजेपूल ग्रामपंचायत विध्यमान सरपंच पुजा गायकवाड यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना निवेदन दिले आहे. शेंङकरवाङीतील ग्रामस्थ मंङळींनी देखील राष्ट्रवादी काँग्रेस बारामती तालुकाध्यक्ष संभाजीनाना होळकर यांना देखील शौचालय बांधकामा बाबतीत कळविले आहे. खासदार सुप्रिया सुळे यांना देखील निवेदन देण्यात आले आहे.
तरी जुने शौचालय नादुरुस्त झाल्यामूळे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची कुचंबना होत आहे.
लोकप्रतिनिधी यांनी लक्ष घालून शौचालय बांधकामाचा विषय लवकरात लवकर मार्गी लावावा हिच शेंङकरवाङी ग्रामस्थांच्या वतीने विनंती.