पुरंदर l नीरेत आषाढी एकादशी उत्साहात साजरी : दर्शनासाठी आलेल्या भाविकांना खिचडी वाटप

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम----
निरा : विजय लकडे
आषाढी एकादशी निमित्त नीरा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमचे आयोजन करण्यात आले होते. नीरेतील भाविकांनी मोठ्या श्रद्धेने विठ्ठल रुक्मिणीच्या पायावर नतमस्तक होऊन दर्शन घेतले.                   आज बुधवारी सकाळी विठ्ठल रखुमाईच्या दर्शनासाठी मोठी रांग लागली होती. आणि यावेळी निरा येथील प्रसिद्ध ज्येष्ठ विधीज्ञ आदेश गिरमे यांच्यावतीने मंदिरात आकर्षक फुलांची सजावट केली होती तसेच त्यावेळी खिचडी  वाटप  करण्यात आले. 
       आषाढी एकादशी निमित्ताने पंढरपूरला जाणाऱ्या संत सोपानकाकांच्या दुपारचा विसावा व परतीच्या प्रवासात संत ज्ञानेश्वर महाराजांचा दुपारचा विसावा असलेल्या नीरा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात एकाशीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पहाटे साडेचार वाजता ज्येष्ठविधीज्ञ आदेश गिरमे व मधुकर माने यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणी मुर्तीची विधिवत पुजा करण्यात आली. या पुजेचे पौराहित्य सचिन घोडके यांनी केले. श्री ज्ञानेश्वरी पारायण व किर्तन महोत्सवात समितीच्या वतीने सकाळी आठ वाजल्यापासून खिचडी वाटप करण्यात आला. यावेळी समितीचे अध्यक्ष प्रभुदयाळ अग्रवाल, जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष लक्ष्मणराव चव्हाण, चंदरराव धायगुडे, कल्याण जेधे, उत्तम घुले-पाटील, मदन चव्हाण, विजय पवार, विलास धायगुडे, नंदकुमार महामूनी, सुभाष पवार, सुरेश सप्काळ, सुदाम बंडगर, संभाजी जेधे, माणिक म्हस्के यांनी खिचडी वाटप केले. परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दुपारी नीरा भजनी मंडळाच्या सदस्यांनी भजनाचा कार्यक्रम सादर केला.  आदेश गिरमे यांच्यावतीने मंदिरात केलेल्या आकर्षक फुल सजावटीने मंदिर अधिक आकर्षक दिसत आहे. 
To Top