सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सुपे : प्रतिनिधी
ब्रह्मा ऍग्रो फाउंडेशन तर्फे राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला. यामध्ये बारामती तालुक्यातील प्रमोद अनिल देव यांना राज्यस्तरीय शेती निष्ठ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
माढा जि. सोलापूर येथे पुरस्कार वितरण कार्यक्रम पार पडला. प्रमुख पाहुणे म्हणून परळी वैजनाथ येथील मा. नगराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी होते. यावेळी कसबे तडवळे ता.जि.धाराशिव येथील सेंद्रिय शेतीचे पुरस्कर्ते व शेतीतज्ञ डॉ.प्रल्हाद जोशी यांना 'कृषी भूषण', मु.पो. सुपे ता.बारामती शेतकरी प्रमोद देव यांना 'शेती निष्ठ' व मु.पो.नान्नज ता.जि.सोलापूर येथील शेतकरी प्रकाश पाटील यांना 'शेती मित्र' पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. तसेच पंढरपूर येथील वे.शा.सं.श्री.प्रसाद मुकुंद सप्ताश्व यांना 'वेदभूषण' पुरस्कार देण्यात आला.या पुरस्कार सोहळ्यास विविध भागातून मान्यवर उपस्थित झाले होते.
'ब्रह्मा अँग्रो फाउंडेशन' ही संस्था महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना एकत्रित आणून शेतीमधील विविध क्षेत्रात कार्यरत तज्ञमंडळीचे मार्गदर्शन व शेतात प्रत्यक्ष कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांना पुरस्कार देवून सन्मानित करतात. आजचा राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा यशस्वी करण्यासाठी संस्थापक अध्यक्ष विवेकजी कुंभेजकर यांचे सहकार्य लाभले.
COMMENTS