सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
मोरगाव : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील लोणीभापकर गावच्या हद्दीत पिकअप ने दुचाकीला धडक दिल्याने यात चार मुली जखमी झाल्या आहेत. ही घटना सकाळी साडेअकराच्या सुमारास लोणीभापकर-पळशी रस्त्यावरील शेंडगेवस्ती जवळ घडली.
या अपघातात स्वरा मानसिंग ढमाले वय ८ वर्षे, अर्पिता मानसिंग ढमाले वय ११ वर्षे, तनुजा महेंद्र धायगुडे वय ११ वर्षे व श्रावणी अनंत काळे वय १२ वर्ष सर्व रा. पळशी या मुली जखमी झाल्या आहेत. याबाबत मानसिंग विश्वासराव ढमाले यांनी वडगाव निंबाळकर पोलीसात दाखल केलेल्या तक्रारावरून पोलिसांनी अक्षय गणेश मदने रा. गुणवडी ता. बारामती याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.