सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती व पुरंदर तालुक्यातील गावांचा होणारा विकास पर्यावरण पूरक व्हावा या हेतूने आदरणीय अजितदादा पवार यांच्या ६५ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने 'हरित ग्राम'ही संकल्पना ऋषी गायकवाड मित्र परिवाराच्या माध्यमातून राबवली होती.
सोमेश्वर परिसरामध्ये अजितदादा उद्यानांतर्गत स्थापन केलेल्या सोमेश्वर देवराईच्या रूपाने सुरू झालेल्या वृक्ष लागवड मोहिमेचा पुढील टप्पा असणाऱ्या या संकल्पनेमधे एकूण ३०६५ देशी झाडांच्या रोपांचे मोफत वाटप करण्यात आले. या संकल्पनेमधे पुरंदर तालुक्यातील राख नावळी, नीरा, बोपगाव,पवारवाडी तसेच बारामती तालुक्यातील मूटी, अंजनगाव,सस्तेवाडी, मुढाळे,कुरणेवाडी, मानाजी नगर, सायबांचीवाडी, सुपे.मुरूम, खंडोबाचीवाडी,निंबुत, वानेवाडी, मगरवाडी, माळेगाव, करंजेपूल,करंजे, थोपटेवाडी,वाकी, कोराळे खुर्द,लोणी भापकर,मूर्ती मोढवे, माळशिकारे वाडी, वाघळवाडी, फलटण तालुक्यातील जिंती या गावातील नागरिकांनी आपली झाडांची मागणी नोंदवली होती. या सर्वांच्या मागणीनुसार मोफत झाडांचे वाटपाचे काम सुरू करण्यात आले.
झाडांमध्ये जांभूळ, आवळा,करंज,पिंपळ,पेरू, आंबा,बहावा,कांचन, ताम्हण,बेहडा,सावर, कुसुंब,कदंब ई देशी झाडांचे संवर्धन करण्यासाठी मोफत वाटप करण्यात आले. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा वाढदिवस असल्या कारणाने महाराष्ट्राचे राज्य फुल ताम्हण हे झाड देऊन नोंदणी केलेल्या नागरिकांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमासाठी सोमेश्वर कारखान्याचे चेअरमन पुरुषोत्तम जगताप, मा. बांधकाम सभापती प्रमोद काकडे, राजवर्धन शिंदे, विजयकुमार सोरटे, सोमेश्वर कारखान्याचे व्हॉईस चेअरमन बाळासाहेब कामठे, रमाकांत गायकवाड, बाळासाहेब गायकवाड, कुणाल गायकवाड, अनिल गायकवाड, सुनील भगत, सुनील भोसले, शैलेश रासकर, लक्ष्मण गोफणे, हरिभाऊ भोंडवे, प्रवीण कांबळे, रंजीत मोरे, रूपचंद शेंडकर, दत्तात्रेय वायाळ, सोमनाथ सोरटे, तानाजी भापकर, गणेश जाधव, हेमंत गायकवाड, भाऊसाहेब हुंबरे, कैलास मगर, अजिंक्य सावंत, किरण जगदाळे, शिवाजी शेंडकर, सागर गाडेकर, हरीष गायकवाड, निलेश गायकवाड, सागर गायकवाड, मंगेश गायकवाड, संजय गायकवाड, सुहास गायकवाड,माणिक लकडे, आबा चाचर,किरण कदम इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संचालक ऋषी गायकवाड यांनी केले तर आभार करंजेपुलचे उपसरपंच प्रवीण गायकवाड यांनी मानले.
-------------------------
बारामती व पुरंदर तालुक्यातील गावांचा विकास हा सर्वांगीण असावा,चिरकाल टिकणारा असावा तसेच पर्यावरण पूरक असावा या कल्पणेमधून व ग्रामीण भागातील वृक्षारोपण वाढविण्याच्या हेतूने एकूण ३०६५ देशी वृक्षांच्या रोपांचे मोफत वाटप केले.
ऋषी गायकवाड
संचालक सोमेश्वर कारखाना