सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
निरा : विजय लकडे
निरा खोऱ्यातील निरा देवघर धरण ६० टक्के, भाटघर धरण ६७ टक्के, गुंजवणी धरण ७१ टक्के तर वीर धरण ८५ टक्के भरले असून आज सायंकाळ पर्यंत निरा नदीला पाणी सुटण्याची शक्यता आहे.
नीरा धरणामध्ये पाण्याची आवक पाहता वीर धरणामधून आज सायंकाळपर्यंत नीरा नदीमध्ये केव्हाही विसर्ग सोडण्यात येईल, तरी नीरा नदी काठच्या लोकांना सुरक्षिततेच्या दृष्टीने काळजी घेऊन कोणत्याही प्रकारची जिवीत व वित्तहानी होणार नाही याची दक्षता घेण्याबाबतचे आवाहन जलसंपदा विभागाने केले आहे.