मोठी बातमी l नीरा नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा : वीर धरणामधून नीरा नदीमध्ये ४८ तासात कोणत्याही क्षणी...

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
निरा : विजय लकडे
नीरा देवघर, भाटघर व गुंजवणी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर भरपूर असल्याने वीर धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ होत आहे. दिनांक २४ रोजी वीर धरणाची पाणी पातळी ५७७.६९ मी. व उपयुक्त पाणीसाठा ७.१३२ टीएमसी इतका असून धरण ७५.८०% भरले आहे.
          वीर धरणामध्ये पाण्याची आवक पाहता वीर धरणामधून येत्या ४८ तासात नीरा नदीमध्ये केव्हाही विसर्ग सोडण्यात येईल, तरी नीरा नदी काठच्या गावांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने काळजी घेऊन कोणत्याही प्रकारची जिवीत व वित्तहानी होणार नाही याची दक्षता घेण्याबाबतचे आवाहन कार्यकारी अभियंता शिवाजी जाधव यांनी केले आहे. 
To Top