Dam update l वीर धरण तीन वेळा भरलं : निरा नदी पात्रात २४ हजार क्युसेसने पाण्याचा विसर्ग : चार धरणांचा आजचा पाणीसाठी किती पहा

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
निरा : विजय लकडे
डोंगर माथ्यावर पावसाचा जोर आज पुन्हा वाढल्याने सकाळपासून पुरंदर तालुक्यातील वीर धरणातून निरा नदीत १३ हजार ९११ ने पाण्याचा विसर्ग सुरू होता तो वाढवून सायंकाळी ६ वाजता २४ हजार ३८५ करण्यात आला आहे. 
          निरा खोऱ्यातील निरा-देवघर, यशाजी कंक जलाशय, गुंजवणी ही धरणे भरण्याच्या मार्गावर आहेत तर वीर धरण भरले असून दि. २५ रोजी सकाळी ११ वाजता पहिल्यांदा वीर धरण भरल्यानंतर तीन दरवाज्यामधीन निरा नदीत पाण्याचा विसर्ग सुरू केला होता.
त्यानंतर अनेकवेळा पाण्याचा विसर्ग कमी जास्त करण्यात आला. आतापर्यंत सर्वात जास्त ६१ हजार क्युसेसने निरा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. आज सायंकाळी ६ वाजता कमी केलेला पाण्याचा विसर्ग वाढवून २४ हजार क्युसेस करण्यात आला आहे. 
       निरा-देवघर धरणात ७९.७१ टक्के, भाटघर धरणात ८२.८२ टक्के, वीर धरणात ९७.४६ टक्के तर गुंजवणी धरणात ७१.०१ टक्के पाणीसाठा आहे
To Top