सोमेश्वर रिपोर्टर टीम------
वेल्हे : मिनल कांबळे
राजगड तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभाग, भूमिअभिलेख विभाग, कृषी विभाग, महसुल विभाग मधील काम चुकार अधिका-याची झाडाझडती घेत चांगलेच फैलावर घेतले, काम चुकार अधिका-यांची गय केली जाणार नाही असे खडेबोल आमदार संग्राम धोपटे सुनावले.
वेल्हे येथील आयोजित तालुका समन्वय समितीच्या बैठकीत केले, वेल्हे पंचायत समितीच्या सभागृहात समन्वय समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी आमदार संग्राम थोपटे यांनी अधिका-यांना इशारा दिला यावेळी उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे, तहसिलदार श्रीनिवास ढाणे, गटविकास अधिकारी पंकज शेळके, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितिन खामगळ, माजी सभापती दिनकर सरपाले, राजगड काराखान्याच्या संचालिका शोभा जाधव माजी जिल्हा परिषद सदस्य दिनकर, घरपाळे, अमोल नलावडे, नाना राऊत, युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष शिवराज शेंडकर, उपाध्यक्ष गणेश जागडे, मार्गासनीचे माजी सरपंच विशाल वालगुडे, वांगणीचे माजी सरपंच शिवाजी चोरघे, रमेश शिंदे, सागर मळेकर, आकाश वाडघरे, सुनिल राजीवडे, रविंद्र घाडगे, आदीसह सर्व विभागांचे कर्मचारी उपस्थित होते.
बया बैठकीत विभागावार आढावा घेण्यात आला, तालुक्यात पशुसंवर्धन विभागात डॉक्टरांची पदे रिक्त असल्याने नागरिकांना याची सेवा मिळत नाही तालुक्यात पशुवैद्यकीय सेवा देण्यासाठी एकच डॉक्टर असल्याची तक्रार यावेळी नागरिकांनी केली, तर कृषी विभागाकडून मागील वर्षी शेतक-यांनी काढलेल्या पिकविम्याचे पैसे अद्याप शेतक-यांना मिळाले नसल्याची तक्रार शेतक-यांनी मांडली, तर तालुका भूमिअभिलेख कक्षांतील अधिकारी व्यवस्थित काम करीत नसल्याची तक्रार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका प्रमुख दीपक दामगुडे यांनी केली, याबाबत संबंधित अधिकायांची बदलीचे प्रस्ताव पाठविण्याच्या सुचना वरिष्ठ अधिका-यांना दिल्या, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रख्याच्या बाजुला अतिक्रमण झाले असुन नव्याने केलेल्या रस्ता उखडला जाण्याची शक्यता निर्माण झाल्याची तक्रार सुनिल राजीवडे यांनी केली. तर वेल्हे ते चेलाडी रस्त्याची दुरावस्था झाल्याची तक्रार विशाल वालगुडे यांनी केली. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे पुणे विभागाचे मुख्य अधिकारी यांना बोलावुन तालुक्यातील रस्त्याची अवस्था दाखवण्याची सुचना आमदार संग्राम थोपटे यांनी यावेळी केली.
COMMENTS