सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
वेल्हे : मिनल कांबळे
वेल्हे येथील ग्रामपंचायतीच्या मनमानी कारभाराचा येथील शेतक-यांस फटका बसला असुन पाण्याच्या टाकीमुळे शेतक-यांच्या घरात पाणी घुसुन लाखोंचे नुकसान झाले आहे.
याबाबत ग्रामपंचायतीचे तत्कालीन सरपंच संदीप नगिने व सदस्यांवर कारवाईची मागणी शेतक-यांचे भाऊ तानाजी राजीवडे यांनी केली आहे. याबाबत अधिक माहीती अशी कि वेल्हे येथील शेतकरी प्रकाश नारायण राजीवडे हे त्यांच्या कुटुंबासह जुने तहसिल कार्यालयाशेजारी राहत आहे.त्यांची पत्नी व दोन मुले व वृद्ध आई घरात राहत आहे.तत्कालीन
सरपंच संदीप नगिने यांनी मनमानी कारभार करुन या घराच्या शेजारी असलेल्या टाकीमध्ये कड्यावरील पाणी सोडले, या पाण्याच्या टाकीमध्ये तोरणा किल्ल्यावरील डोंगरावरील कडयास साधा पाईप टाकुन पाणी टाकीत टाकले सोडले आहे.या टाकीतुन संपुर्ण वेल्हे गावास पाणीपुरवठा केला जातो.या टाकीत कड्यावरील पाणी नियमित सोडले जात आहे.अतिरिक्त झालेल्या पाण्याची कोणतेही सोय ग्रामपंचायकडुन करण्यात आलेली नाही.सध्या वेल्हे तालुक्यात संततधार पाऊस सुरु असुन ओढे नाल्यांना नदीचे स्वरुप आले असुन या कड्यावरील पाणी नियमित टाकीत येत आहे.पावसाच्या पाण्यामुळे ही टाकी फुल झाली व ते पाणी येथील शेतकरी प्रकाश राजीवडे यांच्या घरात घुसले घरातील सर्व खोल्यात गु़डघाभर पाणी तुंबले होते,त्यामुळे शेतक-.यांच्या घरातील ज्वारी,तांदुळ,डाळी,खते,बि-बियाणे
कपडे,कापडी गाद्या भिजले आहेत.येथील शेतक-यांचे लाखोचं नुकसान झाले आहे.याबाबत शेतक-यांचे भाऊ तानाजी राजीवडे म्हणाले शेतकरी प्रकाश राजीवडे यांनी गावातील पाणीपुरवठा योजनेसाठी स्वतची जागा विना मोबदला दिली.याच जागेवर पाण्याची टाकी बांधण्यात आली. ज्या शेतक-यांने जागा दिली त्याच शेतक-यांवर ग्रामपंचायतीकडुन अन्याय करण्यात आला आहे.या गोष्टी चार वेळा घडल्या आहेत.वेळोवेळी ग्रामुपंचायतीच्या निदर्शनास
आणल्या होत्या तरीदेखील कोणतेही ठोस पाऊल ग्रामपंचायतीकडुन उचलले गेले नाही.तत्कालीन सरपंच संदीप नगिने व सदस्यांवर कारवाई व्हावी अशी मागणी तानाजी राजीवडे यांनी केली आहे.
COMMENTS