सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : महेश जगताप
वादग्रस्त सनदी अधिकारी पूजा खेडकर यांचे बारामती कनेक्शन नुकतेच समोर आले आहे. पूजा खेडकर यांच्या कुटुंबियांनी बारामती तालुक्यात जमीन खरेदी केली. दिलीप धोंडीबा खेडकर यांनी १४ वर्षांपूर्वी १४ गुंठे जमीन खरेदी केली आहे. त्याचा सातबाराही उपलब्ध झाला आहे.
याबाबत बारामती तालुक्यातील वाघळवाडी येथे दिलीप खेडकर यांची १४ गुंठे जमीन असल्याचं ट्विट करत आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार यांनी समोर आणली होती. बारामती तालुक्यातील वाघळवाडी येथे दिलीप खेडकर यांची १४ गुंठे ही जमीन विक्री करायची असल्याने त्या ठिकाणी खेडकर कुटुंबियांनी तसा बोर्ड लाऊन जमीन विकायला काढली आहे. दीड कोट इतकी जमीनीची किंमत असल्याचे सांगितले जात आहे. वाघळवाडी ग्रामपंचायत हद्दीत गट क्रमांक ८ मध्ये दिलीप खेडकर यांच्या नावावर १४ गुंठे सदरची जमीन आहे.
यामध्ये नवीन माहिती समोर आली आहे. वाघळवाडी येथे असलेल्या खेडकर यांच्या ७/१२ वरती नावाची स्पेलिंग दुरुस्ती असा बदल करण्यात आला आहे. दिलीप धोंडीबा खेडकर ऐवजी आता नवीन नाव दिलीप कोंडिबा खेडकर असा ७/१२ वरील नावात बदल करण्यात आला आहे. वादाच्या भव-यात अडकलेल्या खेडकर कुटुंबातील सदस्याच्यावर विविध गुन्हे दाखल झाले असून चौकश्याचा ससेमिरा मागे लागला असताना ७/१२ वरील नोंद दुरुस्त केल्याने अगोदर नावांचा घोळ समोर आला असताना आता नव्याने ७/२ वरील नाव बदल्याने दिलीप कोंडिबा खेडकर कोण ? आणि दिलीप धोंडीबा खेडकर कोण ? की एकच व्यक्ती आहेत.असा प्रश्न उपस्थित होत आहे.
COMMENTS