सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सुपे : दीपक जाधव
बारामती तालुक्यातील काऱ्हाटी येथील कन्हेर ओढ्याला गेली दहा वर्षात प्रथमच आलेल्या जनाईच्या पाण्याचे पुजन ग्रामस्थांच्यावतीने करण्यात आले.
गेली दहा वर्षात काऱ्हाटी येथील कन्हेर ओढ्याला जनाईचे पाणी आलेले नाही. त्यामुळे गेली अनेक वर्षे पाणी सोडण्याची मागणी होती. मागिल काही महिण्यात शेतकरी संघर्ष कृषी समितीच्यावतीने पाण्यासाठी आंदोलन केले होते. त्यावेळी ही काऱ्हाटीला पाणी मिळण्याची मागणी करण्यात आली होती.
त्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पाणी सोडण्याबाबतचे निवेदन दिल्याचे उपसरपंच गणेश शिंदे यांनी सांगितले. त्यानुसार नागपंचमीच्या दिवशी काऱ्हाटी येथील कन्हेर ओढ्याला जनाईतुन ओव्हरफ्लोचे पाणी सोडण्यात आले.
गेली दहा वर्षात प्रथमच आलेल्या या पाण्याचे पुजन उपसरपंच गणेश शिंदे, अशोक सर्जेराव लोणकर, राजेंद्र राऊत, एकनाथ शिंदे आदी परिसरातील शेतकऱ्यांनी केले.
काऱ्हाटी परिसरात अद्याप पाऊस मोठ्या प्रमाणात झालेला नाही. त्यामुळे कऱ्हा नदी वरील बंधारे कोरडे आहेत. जनाईचे आलेल्या पाण्यामुळे खरीप पिकांना जिवदान मिळेल अशी माहिती गणेश शिंदे यांनी दिली.