सुपे परगणा l कोळोलीतील आरती काटेचे सेट परीक्षेतयश

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सुपे : दीपक जाधव 
बारामती तालुक्यातील कोळोली येथील आरती संतोष काटे या विद्यार्थींनीने राज्यशास्त्र या विषयातुन राज्यस्तरीय पात्रता परीक्षेत (सेट) यश संपादन केले. 
         काटे हिने कोळोली या खेडेगावात राहुन हे यश मिळविले. महाराष्ट्र व गोवा या दोन राज्यातील महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापक पदासाठी आवश्यक असणारी राज्यस्तरीय पात्रता परीक्षेत (सेट) महाराष्ट्रातुन सुमारे १ लाख ९ हजार २५० विद्यार्थी परिक्षेला बसले होते. त्यापैकी ७ हजार २७३ विद्यार्थी पात्र ठरले. 
        काटे यांनी राज्यशास्त्र या विषयातून महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापक पदासाठी आवश्यक असणारी राज्यस्तरीय पात्रता परीक्षेत (सेट) ३०० पैकी १९२ गुण मिळवुन यश संपादन केले. 
      या यशाबद्दल पंचायत समितीच्या माजी उपसभापती प्रभावती काटे, माजी पं. स. सदस्य संपतराव काटे तसेच कोळोली आणि परिसरातील ग्रामस्थांनी तिचे विशेष अभिनंदन केले.
     ..................................
To Top