सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
बारामती : प्रतिनिधी
पाऊस थांबताच दोन महिन्यांच्या विश्रांतीनंतर बारामती तालुक्यात रात्रीच्या वेळी ड्रोन पुन्हा ऍक्टिव्हेत झाले असून अंधार पडताच ड्रोनच्या घिरट्या सुरू झाल्या आहेत.
गेल्या आठ दिवसांपासून बारामती,पुरंदर, दौंड व इंदापूर तालुक्यातील गावांमधून रात्रीच्या वेळी ड्रोन उडताना दिसत आहेत. त्यामुळे नागरिकांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नक्की हे रात्रीच्या वेळी उडणारे ड्रोन कोणाचे? याबाबत कोणालाच कल्पना नाही. यावर पोलीस अथवा प्रशासन कोणाचं बोलायला तयार नाही.
मागील दोन महिन्यांपूर्वी पुणे जिल्ह्यातील बारामती, पुरंदर, दौंड व इंदापूर तसेच फलटण तालुक्यातील काही गावांमधून रात्रीच्या वेळी हे ड्रोन उडताना दिसत असल्याने नागरिकांच्यात भीतीचे वातावरण आहे. ड्रोन कॅमेऱ्यांच्या घिरट्या नागरिकांनी पाहिल्या. त्याबाबतचे व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले.काही गावातून चोऱ्या वाढल्या त्यामुळे हे ड्रोन चोरटे उडवत आहेत का असा संशय बळावला असून चोऱ्यांची घटना लक्षात घेता नागरिकांनी सतर्क राहण्याची आवश्यकता आहे. अनेक ठिकाणी चोऱ्या झाल्या. चोरीच्या या घटनांमागे ड्रोन कॅमेरेच असल्याचे नागरिकांचे म्हणणे असून पोलिसांनी याचा तातडीने तपास करण्याची मागणी ग्रामस्थ करत होते. त्यानंतर पाऊस सुरू झाला आणि ड्रोनच्या घिरट्या थांबल्या होत्या मात्र काल दि. ९ पासून रात्रीच्या वेळी ड्रोनच्या घिरट्या सुरू झाल्याचे ग्रामस्थांनी पाहिले.