सोमेश्वर रिपोर्टर टीम------
नीरा : प्रतिनिधी
निंबुत नजीक खंडोबाचीवाडी येथील (ता. बारामती) येथील प्रज्वल विशाल लकडे हा ५ वर्षाचा मुलगा काल रविवारी दि. ४ वाजल्यापासून बेपत्ता होता. आज दुपारी १२ वाजता निरा डाव्या कालव्यात त्याचा मृतदेह आढळून आला.
काल पासून त्याला शोधण्याचे काम सुरू होते. आज दुपारी १२ वाजता खंडोबाचीवाडी येथे पालथा नालामध्ये पाच वर्षांचा प्रज्वलचा मृतदेह आढळून आला. खंडोबाची वाडी येथील पाच वर्षे वयाच्या मुलाचा शोध अखेर खंडोबाची वाडी येथील डाव्या कालव्याच्या पालथा नाला येथे थांबला. रविवारी दुपारी चार वाजल्यापासून इतर लहान मुलांबरोबर खेळत असलेला प्रज्वल अचानक बेपत्ता झाला सगळीकडे शोधाशोध केल्यानंतरही त्याचा कुठेही ठावठिकाणा लागला नाही. अखेर करंजेपुल पोलीस स्टेशन ला तो हरवल्याची तक्रार देखील देण्यात आली संपूर्ण गावाने शोध मोहीम घेऊन देखील त्याचा कुठेही थांब पत्ता लागत नव्हता.
आज सकाळी मोठ्या पोकलेन मशीन ने डाव्या कालव्यावरील पालथानाला नजीक गाळामध्ये उकरले असता त्यामध्ये त्याचा मृतदेह आढळून आला. कॅनॉल च्या कडेला अनेक मुले खेळायला येत असतात यामध्ये खेळताना त्याचा पाय घसरून डाव्या कालव्यामध्ये तो पडून वाहून गेल्याचा अंदाज आहे. गेल्या पंधरा वर्षांपूर्वी देखील असेच दोन लहान मुलांचा जीव या डाव्या कालव्याच्या शेजारी खेळताना गेला आहे त्याचीच पुनरावृत्ती आज पुन्हा खंडोबाचेवाडीत घडली यामुळे संपूर्ण खंडोबाचीवाडी गावावर ती शोककळा पसरली आहे.