सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
आम्ही निरा पोलीस स्टेशनचे पोलीस असल्याचे सांगत मुरूम ता. बारामती येथील किराणा दुकानात असलेल्या महिलेच्या गळ्यातील 2 लाख रुपये किंमतीचे सव्वादोन तोळे सोन्याचे गंठन पळविल्याची घटना दि. 4 रोजी सकाळी साठेआठ वाजल्याच्या सुमारास घडली.
याबाबत बेबी दत्तात्रेय उगले वय 68 वर्षे रा .मुरूम ता.बारामती जि.पुणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून 25-30 वर्ष वयोगटातील दोन अनोळखी इसमानविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बेबी उगले ह्या मुरूम येथील पार्थ किराणा दुकानात असताना दोन अनोळखी इसम वय अंदाजे 25 ते 30 वर्षे वयाचे मोटार सायकलवरून संगणमताने येवुन त्यापैकी एकाने बेबी उगले यांना मी निरा पोलीस आहे असे म्हणुन पोलीस असल्याची बतावणी करुन फिर्यादीस 500 रुपये सुटटे देवुन 500 रुपयांची बंदी नोट घेवुन सदरची नोट फिर्यादीचे गळयाला लावून हातचलाखी करुन त्यांचे गळयातील सोन्याचे साखळीच्या डिझाईनचे सव्वादोन तोळयाचे मीनी गंठण हातचलाकीने फसवुन त्यांचे ताब्यातील मोटार सायकलवरुन घेवुन गेले आहेत.