सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
करंजेपुल ता. बारामती येथील शुभांगी बापूराव हाके व आकांक्षा किशोर हुंबरे या दोघींची जलसंपदा विभागामध्ये स्थापत्य अभियांत्रिक सहाय्यकपदी निवड झाली आहे.
करंजेपुल ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सन्मान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जनसंपर्क कार्यालयामध्ये करण्यात आला.शुभांगी बापूराव हाके यांची जलसंपदा संभाजीनगर मध्ये नियुक्ती झाली तर कु.आकांक्षा किशोर हुंबरे यांची जलसंपदा सातारा मधे नियुक्ती झाली.
ग्रामस्थांच्या वतीने सन्मान करण्यात आला त्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले आणि सर्व ग्रामस्थांच्या आभार मानले.
या कार्यक्रमासाठी सोमेश्वर कारखान्याचे संचालक ऋषी गायकवाड, करंजेपुलचे उपसरपंच प्रवीण गायकवाड, करंजेपुलचे मा. उपसरपंच निलेश गायकवाड, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष हरीश गायकवाड,करांजेपुल मा. तंटामुक्ती अध्यक्ष सागर गायकवाड, करंजेपुल ग्रामपंचायत सदस्य सुहास गायकवाड,बाळासाहेब चौधरी, अशोक चौधरी,मंगेश गायकवाड, सुहास गायकवाड, दौलत साळवे, किशोर हुंबरे, बापूराव गायकवाड, बापूराव हाके उपस्थित होते.