सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
श्री सोमेश्वरच्या श्रावणी यात्रेनिमित्त सौ.सुनेत्रा वहिनी अजितदादा पवार खासदार केसरी हे बैलगाडा शर्यतीचे मैदान काल चौधरवाडी येथे पार पडले. या खासदार केसरी किताबासाठी महाराष्ट्रातून 532 बैलगाडी मालकांनी सहभाग नोंदवला होता.
या बैलगाडा शर्यतीसाठी प्रथम क्रमांकाचे बक्षीस 1 लाख रुपये, द्वितीय क्रमांकाचे बक्षीस 75 हजार रुपये, तृतीय क्रमांकाचे बक्षीस 51 हजार रुपये, चतुर्थ क्रमांकाचे बक्षीस 31 हजार रुपये, पाचव्या क्रमांकाचे बक्षीस 21 हजार रुपये, सहाव्या क्रमांकाचे बक्षीस 15 हजार रुपये, सातव्या क्रमांकाचे बक्षीस 11 रुपये, आठव्या क्रमांकाचे 10 दहा हजार रुपये व प्रत्येक बक्षिसासाठी सन्मानचिन्ह म्हणून २ ढालींचा समावेश होता.
खासदार केसरी किताबाचे मानकरी व प्रथम क्रमांकाचे मानकरी पीर साहेब प्रसन्न पिंटू शेठ मोडक यांचा कॉकटेल व गोकुळ अण्णा झेंडे यांचा चिक्या या बैल जोडीचा प्रथम क्रमांक आला.
द्वितीय क्रमांकाचे मानकरी ज्योतिबा प्रसन्न तनिष्का सागर राजे घाडगे मुरुम, तृतीय क्रमांकाचे मानकरी आई गावदेवी प्रसन्न मल्हार केरबा पाटील नेरे पनवेल, चतुर्थ क्रमांकाचे मानकरी जय हनुमान प्रसन्न संग्राम ग्रुप नीरा, पाचव्या क्रमांकाचे मानकरी श्रीनाथ प्रसन्न चंद्रकांत मांगडे मांगडेवाडी कात्रज, सहाव्या क्रमांकाचे मानकरी महालक्ष्मी प्रसन्न स्वप्निलराजे दीपक साखरे, सातव्या क्रमांकाचे मानकरी ज्योतिर्लिंग प्रसन्न अनुजा नितीन शेवाळे वडकी,आठव्या क्रमांकाचे मानकरी जय तुळजा भवानी प्रसन्न हॉटेल शौर्य वाडा उरुळी कांचन.
या बैलगाडा शर्यतीच्या आयोजन ऋषी गायकवाड मित्रपरिवार संग्राम सोरटे मित्र परिवार यांच्या वतीने करण्यात आले होते.