Bhor News l भोर शहरातील नागरिकांच्या अडचणी तात्काळ सोडवा : नगरपरिषदेत आमदार थोपटेंची आढावा बैठक

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
भोर नगरपरिषदेत आमदार संग्राम थोपटे यांनी खाते निहाय मंगळवार दि.६ आढावा बैठक घेत शहरातील विविध समस्यांची व विकास कामांची माहिती घेतली.आढावा बैठकीत शहरातील नागरिकांना वारंवार येणाऱ्या बहुतांशी अडीअडचणी याची नगरपरिषद प्रशासनाने तात्काळ सोडवणुक करावी तसेच अतिक्रमण ताबडतोब हटवावीत अशा सूचना नगरपरिषद प्रशासनाला दिल्या.
         नगरपरिषद सभागृहात घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत आमदार थोपटे बोलत होते.यावेळी नगरपालिका मुख्याधिकारी श्रीराम पवार,माजी उपनगराध्यक्ष रामचंद्र आवारे,माजी नगरसेवक सचिन हर्नस्कर,गणेश पवार,जगदीश किरवे,समीर सागळे,अमित सागळे,सुमंत शेटे,चंद्रकांत मळेकर,गणेश मोहिते,अभिजीत सोनवणे,पवन भागने,पाणी विभाग खुराडे ,महेंद्र बांदल,कॉन्ट्रॅक्टर नितीन ओव्हाळ आदींसह नगरपालिका कर्मचारी तसेच माजी नगरसेवक उपस्थित होते.

To Top