Dam update l भाटघर, निरा-देवघर, वीर ओव्हरफ्लो : विसर्ग वाढवला, निरा नदीपात्रात ४३ हजार क्युसेसने पाण्याचा विसर्ग

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
निरा : प्रतिनिधी
भोरचे ब्रिटिशकालीन भाटघर धरण ओव्हरफ्लो
स्वयंचलित ४५ दरवाजे उघडले. नदीपात्रात १८ हजार ५४० क्यूसेक्सने नदीपात्रात विसर्ग सुरू आहे. 
        भोर तालुक्यात यंदा जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात पावसाने हजेरी लावून तालुक्यात सर्वदूर मुसळधार बरसला.यामुळे ब्रिटिशकालीन भाटघर ता.भोर धरण मागील वर्षीच्या तुलनेत दीड महिना अगोदर शुक्रवार दि.२ ऑगस्ट १०० टक्के भरले.धरण भरल्याने निरा खोऱ्यातील शेतकरी समाधान व्यक्त करीत आहेत.
      तालुक्यात पंधरा दिवसांपासून अतिवृष्टी मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याने ओढ़े-नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत.तर भाटघर,नीरा - देवघर धरण क्षेत्रात पाण्याचा साठा झपाट्याने वाढला आहे.२४ टीएमसी असलेले भाटघर धरण ओव्हर फ्लो होऊन नीरा नदीपात्रात विसर्ग सुरू झाला आहे. यामुळे नीरा नदीपात्राशेजारील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. भाटघर धरण ओव्हर फ्लो होऊन ४५ स्वयंचलित दरवाजांमधून विसर्ग सुरू झाला आहे.  
----------
नीरा खोरे - नदीत सोडलेला विसर्ग

भाटघर  =13531 Cusecs
नीरा देवघर =4538 Cusecs
गुंजवणी   =2174 Cusecs 
--------------------------------
वरील तिन्ही धरणांमधून वीर धरणात एकुण 20243 क्यूसेसने पाण्याचा विसर्ग सुरू असून वीर धरणातून निरा नदीत 42983 क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू आहे. 
To Top