Khandala Breaking l वाघळवाडी गावचे तत्कालीन ग्रामसेवक नरसिंह राठोड यांच्या पत्नी व मुलासह भोरच्या सहा जणांवर गुन्हा दाखल : विमा कंपनीची तब्बल १ कोटी १९ लाखांची फसवणूक

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम----
शिरवळ : प्रतिनिधी
तोंडल ता.खंडाळा येथे अपघाताचा बनाव करीत शिरवळ पोलीस स्टेशनला  खोट्या गुन्हा दाखल करीत त्याच्या आधारे विमा कंपनीकडून विम्याची रक्कम भरपाई स्वरूपात मिळविण्याकरिता मोटार अपघात प्राधिकरण न्यायालय, विजापूर, कर्नाटक याठिकाणी खोटा दावा दाखल करीत विमा कंपनीची फसवणूक केल्याप्रकरणी सहा जणांविरुद्ध शिरवळ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेमुळे खंडाळा तालुक्यासह पुणे जिल्हयात खळबळ उडाली आहे. मयत नरसिंग राठोड हे बारामती तालुक्यातील वाघळवाडी येथे ग्रामसेवक म्हणून काम पाहत होते. 
            याबाबतची शिरवळ पोलीसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, तोंडल ता.खंडाळा गावच्या हद्दीमध्ये दि.29 एप्रिल 2023 रोजी नरसिंग दौलत राठोड (वय 55,रा.भोर जि.पुणे ) हे दुचाकी (क्रं-एमएच-12-एसआर-3795) लोणंद ते शिरवळ असे दुचाकीवरून जात असताना दुचाकीवरील नियंत्रण सुटून रस्ता दुभाजकाला धडकून गंभीर जखमी होत उपचारादरम्यान मृत झाले ही वस्तुस्थिती असतानाही विमा कंपनीची फसवणूक करण्याच्या उद्देशाने अपघाताचा बनाव रचत व पोलीसांना खोटी खबर देत मयत नरसिंग राठोड यांचा मुलगा अक्षय राठोड (वय 26),पत्नी उषा नरसिंग राठोड(वय 51,दोघे रा.भोर जि.पुणे),दत्तात्रय शंकर शेटे (वय 25,रा.उत्रोली जि.पुणे) प्रकाश उर्फ बंटी दिगंबर येलगुडे(वय 23) प्राजक्ता दिगंबर येलगुडे (वय23)दोघे रा.नवी आळी,भोर जि.पुणे) स्वप्नील सुनील शिंदे(वय 24,रा.नसरापूर ता.भोर जि.पुणे) यांनी जाणीवपुर्वक व खोटी खबर दिली.याप्रकरणी लोकसेवकाला आपल्या कायदेशीर अधिकाराचा वापर दुसऱ्या व्यक्तीला नुकसान पोहोचेल अश्याप्रकारे करायला लावण्याच्या उद्देशाने अप्रमाणिकपणे व हेतुपरस्पर खोट्या माहितीमुळे खोट्या गुन्ह्यात न्यायालयात तब्बल 1 कोटी 19 लाख 29 हजार 600 रुपयांचा विमा भरपाई दावा करून विमा कंपनीची फसवणूक केल्याप्रकरणी अक्षय राठोड,उषा राठोड,दत्तात्रय शेटे,प्रकाश उर्फ बंटी येलगुडे,प्राजक्ता येलगुडे,स्वप्नील शिंदे यांच्याविरुद्ध शिरवळ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेची विमा कंपनीचे प्रतिनिधी मुझम्मील शेख यांनी शिरवळ पोलीस स्टेशनला फिर्याद दिली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक नयना कामथे हे अधिक तपास करीत आहे.या घटनेमुळे खंडाळा तालुक्यासह पुणे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
To Top