सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
वेल्हे : मिनल कांबळे
आपल्या वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून आळंदी येथील वारकरी विद्यार्थ्यांना एक महिन्याचा किराणा मोफत दिला आहे.
तालुका युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष गणेश जागडे यांच्या वाढदिवसानिमित्त आळंदी येथे वेल्हे तालुक्यातील निराधार तसेच होतकरू मुलांसाठी श्रीरामकृष्ण वारकरी शिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांसाठी वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून एक महिन्याचा किराणा या मुलांसाठी देण्यात आला.
यावेळी बाळकृष्ण महाराज दिंडी सोहळा अध्यक्ष आणि माजी जिल्हा परिषद सदस्य दिनकर धरपाळे पुणे जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष महेश टापरे, मोहन महाराज शिंदे राजगड तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज शेंडकर भोर विधानसभेचे अध्यक्ष अमोल पडवळ कार्याध्यक्ष निलेश पवार ,सागर मळेकर संदीप खुटवड संभाजी खुटवड, संतोष मळेकर ,सुनील खुटवड, प्रकाश बधे, संतोष मळेकर उपस्थित होते. गणेश जागडे यांनी तालुक्यात एक वेगळा आदर्श घालून दिल्या असल्याची चर्चा सर्वत्र होती