मोठी बातमी l 'सोमेश्वर' कारखान्याच्या कार्यक्षेत्रात लवकरच दुसरा सहकारी साखर कारखाना

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम------
नीरा : विजय लकडे
पुरंदर तालुक्यामध्ये उसाचे प्रमाण वाढले आहे.त्यामुळे पुरंदर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी पुरंदरच्या शेतकऱ्यांच्या स्वतःचा असा साखर कारखाना आगामी काळात सुरू करणार असल्याचे आमदार संजय जगताप यांनी पिंपरे खुर्द येथे बोलताना म्हटले आहे. सध्या पुरंदर मध्ये ऊसाचे क्षेत्र वाढले आहे. शेतकऱ्याच्या शेतातील ऊस वेळेवर तोडला जाणे महत्त्वाचा आहे.  त्यासाठी पुरंदरला आता ऊस कारखान्याची गरज असल्याचे आमदार संजय जगताप यांनी यावेळी म्हटले आहे.
             पिंपरे खुर्द (ता.पुरंदर)येथे आमदार संजय जगताप यांची रविवारी पेढे तुला करण्यात आली.पिंपरे खुर्द येथील काँग्रेस कार्यकर्ते गोविंद थोपटे आणि अमर थोपटे या दोन कार्यकर्त्यांनी संजय जगताप यांच्यासाठी  येथील भैरवनाथाला नवस केला होता. हा नवस फेडण्यासाठी पेढे तुला करण्यात आली. यावेळी आमदार संजय जगताप यांनी पुरंदर तालुक्यात केलेल्या विविध विकासकामांचा आढावा घेतला. त्याचबरोबर विरोधकांचाही समाचार घेतला. विरोधकांनी सध्या लोकांना चुकीची माहिती पुरवण्याचा धंदा सुरू केला आहे. सरकार मध्ये त्यांचे ऐकणारे लोक असल्याने सध्या पुरंदर मधील विविध कामांमध्ये अडकाठी आणून लोकांची अडवणूक करण्याचे काम माजी मंत्र्यांकडून सुरू असल्याचे त्यांनी म्हटले. पुरंदर उपसा सिंचन योजनेत शेतकऱ्यांची अडवणूक केली जात असल्याचे देखील त्यांनी म्हटले. माजी मंत्र्यांकडे आता कार्यकर्तेच राहिले नाहीत . त्यामुळे  प्रशासनातील अधिकारच त्यांनी  कामाला लागल्याचे म्हणत शिवतरे यांना टोला लागावला. पिंपरे येथील मंदिराला फरशी बसवणे असेल किंवा अंतर्गत रस्त्याची कामे, पाणी पुरवठा योजना सरकार योजना आपल्या कार्यकाळात मार्गी लावल्याचे म्हणत पिंपरे  येथील विकास सेवा सोसायटीसाठी लवकरच स्वतंत्र इमारत उभी करण्याचा आश्वासन त्यांनी दिले.
    या प्रसंगी पिंपरे गावाचे सरपंच राजेंद्र गायकवाड ,उपसरपंच नंदा गायकवाड ,काँग्रेसचे  नंदुकाका जगताप,सुनीता कोलते  निरेचे उपसरपंच राजेश काकडे, तंटामुक्ती अध्यक्ष बाळासाहेब गायकवाड, ज्ञानेश्वर जाधव,संतोष गायकवाड, बाळू गायकवाड,ग्रामपंचायत सदस्य विजया गायकवाड , सुरेखा दगडे, महेश गायकवाड, साहेबराव शिंदे,सुलोचना गायकवाड, संभाजी थोपटे, मीनाक्षी  जाधव,बाबा दगडे ,भाऊसाहेब गायकवाड माजी उपसरपंच राजेंद्र गायकवाड, गोविंद थोपटे, सोसायटीचे चेअरमन शंकर गायकवाड ,मारुती गायकवाड,  कांताभाऊ राखपासरे , सचिन गायकवाड आदी उपस्थित होते, यावेळी झालेल्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अमर गायकवाड, सूत्रसंचालन राजेंद्र गायकवाड यांनी यांनी केले तर आभार सूरज गायकवाड यांनी मानले .
To Top