सोमेश्वर रिपोर्टर टीम----
नीरा : विजय लकडे
माजी मंत्री विजय शिवतरे हे जलसंपदा खात्याचे मंत्री असताना त्यांना गुंजवणी पाणीपुरवठा योजना करता आली नाही. चुकीच्या पद्धतीने या योजनेचा आराखडा करण्यात आला. ज्याच्यातून लोकांना फायदा होणार नाही. मात्र ठेकेदाराला मोठा फायदा होईल. अशी ही योजना तयार करण्यात आली आणि ती लोकांच्या माथी मारण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र ही चुकीची योजना केली जाणार नाही. पुरंदरचे विमानतळ आणि गुंजवणीची पाणीपुरवठा योजना या योग्य ठिकाणीच केल्या जातील. त्यामुळे झालं नाही केलं नाही असं म्हणून कोणीही फिरलं तरी लोकांना सगळं कळत आहे. त्यांना त्या खात्याचे मंत्री असताना जे काम पूर्ण करता आलं नाही. त्याबद्दल त्यांनी आम्हाला शिकवू नये.असे म्हणत पुरंदर चे आमदार संजय जगताप यांनी माजी मंत्री विजय शिवतरे यांच्यावर टीकास्त्र सोडले.
पिंपरे खुर्द (ता.पुरंदर)येथे आमदार संजय जगताप यांची रविवारी पेढे तुला करण्यात आली.पिंपरे खुर्द येथील काँग्रेस कार्यकर्ते गोविंद थोपटे आणि अमर थोपटे या दोन कार्यकर्त्यांनी संजय जगताप यांच्यासाठी येथील भैरवनाथाला नवस केला होता. हा नवस फेडण्यासाठी पेढे तुला करण्यात आली. यावेळी आमदार संजय जगताप यांनी पुरंदर तालुक्यात केलेल्या विविध विकासकामांचा आढावा घेतला. त्याचबरोबर विरोधकांचाही समाचार घेतला. विरोधकांनी सध्या लोकांना चुकीची माहिती पुरवण्याचा धंदा सुरू केला आहे. सरकार मध्ये त्यांचे ऐकणारे लोक असल्याने सध्या पुरंदर मधील विविध कामांमध्ये अडकाठी आणून लोकांची अडवणूक करण्याचे काम माजी मंत्र्यांकडून सुरू असल्याचे त्यांनी म्हटले. पुरंदर उपसा सिंचन योजनेत शेतकऱ्यांची अडवणूक केली जात असल्याचे देखील त्यांनी म्हटले. माजी मंत्र्यांकडे आता कार्यकर्तेच राहिले नाहीत . त्यामुळे प्रशासनातील अधिकारच त्यांनी कामाला लागल्याचे म्हणत शिवतरे यांना टोला लागावला.