सोमेश्वर रिपोर्टर टीम----
सुपे : दीपक जाधव
बारामती तालुक्यातील आंबी खुर्द येथील माळरानावरील खड्डयात अवैद्य गावठी ( हातभट्टी ) दारु साठा तर वढाणेत हातभट्टीची दुचाकीवर अवैद्य वाहतुक करीत असताना टाकलेल्या दोन्ही छाप्यात सुमारे एक लाख १२ हजार किमतीचा मुद्देमाल सुपे पोलिसांनी हस्तगत केला आहे. यावेळी तिघांसह एक दुचाकी ताब्यात घेण्यात आली आहे.
जॉन पोपीन राठोड ( रा. जेजुरी ता. पुरंदर ), परत्या परमात्मा गुदडावत, पृथ्वीराज युवराज गुदडावत ( दोन्ही रा. खोर ता. दौंड ) या तिघांना ताब्यात घेवुन भारतीय न्याय संहिता व महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल करून पुढील कायदेशीर कार्यवाही करीत असल्याची माहिती सुपे पोलिसांनी दिली.
पोलिसांकडुन मिळालेल्या माहितीनुसार, आंबी खुर्द येथील माळराळावरील खड्डयात अवैद्यरीत्या हातभट्टी गावठी दारुचा साठा असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार या ठिकाणी ३५ लिटर क्षमतेचे २० कॅन असा एकुण ७० हजार किमतीचा मुद्देमाल छापा टाकुन सुपे पोलिसांनी जप्त केला. शनिवारी दुपारी साडेचारच्या दरम्यान कारवाई करण्यात आली. तसेच वढाणेत दुचाकीवरुन अवैद्य हातभट्टीचे दोन कॅन व वाहतुक करणाऱ्याला ताब्यात घेण्यात आले. यावेळी त्यांच्याकडुन एक दुचाकी व दोन प्लॅस्टीकचे कॅन असा ४२ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, बारामतीचे अप्पर पोलीस अधीक्षक संजय जाधव, बारामतीचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली सुपा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील, पोलीस उपनिरीक्षक जीनेश कोळी, पोलीस अंमलदार जयंत ताकवणे, राहुल भाग्यवंत, तुषार जैनक, सचिन दरेकर, किसन ताडगे, संतोष जाविर, सूरज साळुंखे, योगेश सरवदे आदींनी मिळुन कारवाई केली.
...................................